आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेचा इशारा झुगारुन स्‍नोडेनला राजाश्रय देण्‍यास व्‍हेनेझुएला, निकारगुआ तयार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्‍टन- अमेरिकेच्‍या 'सीआयए' या गुप्‍तचर विभागाचा माजी कर्मचारी एडवर्ड स्‍नोडेन याला व्‍हेनेझुएला आणि निकारगुआ या दोन देशांनी राजाश्रय देण्‍याची तयारी दर्शविली आहे. अमेरिकेचा इशारा झुगारत या देशांनी ही भूमिका घेतली आहे. स्‍नोडेन सध्‍या मॉस्‍को येथील आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर अडकलेला आहे. अमेरिकेची हेरगिरीची योजना स्‍नोडेनने उघड करीत अमेरिकेचे बिंग फोडले होते. त्‍यानंतर तो अमेरिकेतून पळाला होता.

एडवर्ड स्‍नोडेनने भारतासह 20 देशांमध्‍ये राजाश्रय मागितला होता. यासाठी 'विकिलीक्‍स'ने त्‍याला मदत केली. परंतु, भारताने त्‍याला राजाश्रय नाकारला. अमेरिकेनेही त्‍याला राजाश्रय देणा-या देशांविरुद्ध इशारा दिला होता. परंतु, व्‍हेनेझुएला आणि निकारगुआ या देशांनी हा इशारा धुडकावला आहे. व्‍हेनेझुएलाने स्‍नोडेनला मानवीय दृष्‍टीकोनातून राजाश्रय देण्‍याची तयारी दर्शविली आहे. व्‍हेनेझुएलाच्‍या स्‍वातंत्र्यदिनी राष्‍ट्राध्‍यक्ष निकोलस मदुरो यांनी ही भूमिका मांडली.

निकारगुआचे राष्‍ट्राध्‍यक्ष डॅनियल ओर्टेगा यांनीही अशाच प्रकारची भूमिका मांडली. परिस्थितीने परवानगी दिल्‍यास स्‍नोडेनला आम्‍ही आश्रय देऊ शकतो. अमेरिकेकडून इतर देशांची हेरगिरी करण्‍यात येत आहे, हे कळाल्‍यावर देशोधडीला लागलेल्‍या व्‍यक्तीची मदत करण्‍याचा आम्‍हाला मुलभूत अधिकार आहे, असे त्‍यांनी सांगितले.

अमेरिकेने मात्र यासंदर्भात प्रतिक्रीया दिलेली नाही.