आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नोडेन धाडसी, व्हेनेझुएलात स्वागत!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅरकस - अमेरिकेच्या हेरगिरीचा पर्दाफाश करणारा एडवर्ड स्नोडेन हा धाडसी तरुण आहे. मानवतेच्या पातळीवर संरक्षणाची गरज असेल तर त्याचे व्हेनेझुएलात स्वागतच आहे, अशा शब्दांत राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांनी शुक्रवारी भूमिका स्पष्ट केली.
स्नोडेनचे संरक्षण करण्यास आम्ही तयार आहोत. स्नोडेन व्हेनेझुएलात कधीही येऊ शकतो. या माध्यमातून मानवतेला सत्याचा धडा मिळेल. त्याची कृती म्हणजे जणू सत्याची बंडखोरी आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील युवकांच्या मनात काय चालले आहे, त्याचेही हे प्रतीक आहे , असे मदुरो यांनी म्हटले आहे. गेल्या रविवारी हाँगकाँगहून आल्यापासून स्नोडेन अजूनही मॉस्कोच्या विमानतळावर आहे. गेल्या सहा दिवसांपासून तो येथेच आहे. स्नोडेनचे स्वागत करणार्‍याव्हेनेझुएला गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेसोबतचे संबंध सुधारण्यावर भर दिला आहे. गेल्या महिन्यात उभय देशांनी परस्परांत राजदूत नेमणुकीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, स्नोडेन प्रकरणात रशियाने अमेरिकेला चांगलेच कोंडीत पकडले आहे. तो मॉस्कोमध्ये येण्या अगोदरच त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला होता, ही माहिती अमेरिकेने आमच्यापासून दडवल्याचा आरोप रशियाने शुक्रवारी केला.

हाँगकाँगला परिणाम भोगावे लागतील: अमेरिका
स्नोडेन प्रकरणात हाँगकाँगने केलेली कृती अत्यंत बेभरवशाची आहे, असा आरोप अमेरिकेकडून शुक्रवारी करण्यात आला. म्हणूनच त्यांना परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही देण्यात आला आहे, परंतु आम्ही जे केले ते नियमानुसार असल्याचा हाँगकाँगचा दावाही अमेरिकेने संतापाने फेटाळला. अमेरिकेचे राजदूत स्टीफन याँग यांनी चीनवरही ठपका ठेवला आहे. स्नोडेनने नॅशनल सेक्युरिटी एजन्सीमधील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून 20 मे रोजी हाँगकाँग गाठले होते. त्यानंतर त्याने अमेरिकेचा भंडाफोड करण्याचा सपाटाच लावला होता.