आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ह्यूगो चावेझचा वारसा मादुरोंकडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅरकस- व्हेनेझुएलामध्ये एका अटीतटीच्या लढतीत नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून निकोलस मादुरो यांची निवड झाल्याचे सोमवारी जाहीर करण्यात आले. देशाचे दिवंगत नेते ह्यूगो चावेझ यांचा राजकीय वारसदार म्हणून मादुरो यापुढे काम पाहतील.

दक्षिण अमेरिकेतील इंधन उत्पादनातील श्रीमंत देश म्हणून व्हेनेझुएलाची ओळख आहे; परंतु चावेझ यांच्या निधनानंतर देशाचे राजकीय भवितव्य अनिश्चित बनले होते. या पार्श्वभूमीवर मादुरो यांच्या निवडीला महत्व आले आहे. राष्ट्राध्यक्ष पदासाठी मादुरो यांना विरोधी पक्षनेते हेन्रीक कॅप्रिल्स यांच्यासोबत कडवी झुंज द्यावी लागली. यात त्यांचा निसटता विजय झाला आहे. चावेझ यांच्या पक्षाकडून त्यांचा विजय जाहीर करण्यात आला आहे. मादुरो यांच्या नावाची घोषणा होताच राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर त्यांच्या हजारो समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. मादुरो यांच्यावर चावेझ यांची डावी विचारसरणी पुढे नेण्याची जबाबदारीआहे.

विरोधकांचा आक्षेप

चावेझ यांचा वारसदार म्हणून मादुरो यांच्या निवडीच्या घोषणेनंतर विरोधी नेते हेन्रीक कॅप्रिल्स यांनी मादुरो यांचा विजय अमान्य केला. मतमोजणी पुन्हा करण्यात यावी, अशी मागणी कॅप्रिल्स यांच्या गटाकडून करण्यात आली आहे. मादुरो तुम्ही पराभूत आहात. प्रत्येक मतांची मोजणी करा, अशी मागणी 40 वर्षीय कॅप्रिल्स यांनी केली आहे. निवडणुकीत मतदान केंद्र ताब्यात घेण्याचे प्रकार घडले आहेत. काही ठिकाणी केंद्र बंद करावी लागली होती.

बस चालक ते राष्ट्राध्यक्ष : मादुरो (50) हे पूर्वाश्रमीचे बस चालक होते, हे सांगूनही खरे वाटणार नाही; परंतु त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. एकेकाळी चालक असलेले मदुरो चावेझ यांचे अत्यंत विश्वासू मानले जात होते. 1998 च्या पहिल्या निवडणुकीपासून मदुरो कायम चावेझ यांच्या बाजूने राहिले. चावेझ यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत मदुरो त्यांच्यासोबत राहिले. संघटनेत कार्यकर्ता नंतर विविध पदे भूषवणा-या मादुरो यांनी नंतर परराष्ट्र मंत्रिपदाची जबाबदारीही मादुरो यांनी सांभाळली.

कशी झाली रस्सीखेच : निवडणुकीत मादुरो आणि कॅप्रिल्स यांना पडलेल्या मतांमध्ये फारसे अंतर नाही. मादुरो यांना 50.66 नागरिकांनी कौल दिला तर कॅप्रिल्स यांच्या पारड्यात 49.1 मते पडली. तीन लाखांहून कमी मतांचा हा फरक आहे.