आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Very Popular Book Among British Mp How To Be An Mp

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रिटनच्या लोकप्रतिनिधींमध्ये सर्वात लोकप्रिय - हाऊ टू बी अ‍ॅन एमपी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनच्या लोकप्रतिनिधींमध्ये सर्वात लोकप्रिय पुस्तक कोणते असेल ? हाऊ टू बी अ‍ॅन एमपी, या पुस्तकाचा वापर ब्रिटनमधील लोकप्रतिनिधींकडून केला जातो.

देशाच्या संसदेतील ग्रंथालयात हे पुस्तक ठेवण्यात आलेले आहे. ते लोकप्रतिनिधींमध्ये चांगलेच प्रिय आहे. नर्मविनोदी शैलीतील या पुस्तकाचा फायदा चांगला लोकप्रतिनिधी बनण्यासाठी करून घेतला जातो. लेबर पक्षाचे माजी लोकप्रतिनिधी पॉल फ्लिन हे या पुस्तकाचे लेखक आहेत. 2010 च्या सरकारमध्ये संसदेवर अनेक तरुण चेहरे निवडून आले होते. प्रत्येक तीन लोकप्रतिनिधीमधील एक नवखा होता. त्यामुळे साहजिकपणे पुस्तकाला असलेली मागणी अधिक दिसून आली.

कारण प्रत्येकाला चांगला लोकप्रतिनिधी होण्याची इच्छा होती. मतदारांचे मन कशाप्रकारे वळवावे, करिअरची गाडी कशी धावेल अशा अनेक युक्त्या फ्लिन यांनी पुस्तकातून दिल्या आहेत. हाऊस ऑफ लॉर्ड्सच्या सभागृहात नवीन सदस्यांनी कशाप्रकारे बसावे, अशा अनेक टिप्स त्यांनी मिश्किल पद्धतीने त्यातून दिल्या आहेत. गेल्या पाच वर्षांपासून देशातील दुस-या क्रमांकाचे सर्वात लोकप्रिय पुस्तक म्हणून या पुस्तकाचा गौरव झाला आहे.