आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Very Serious Attack On Columbia University's Professor Singh

कोलंबिया विद्यापीठातील शीख प्रोफेसर प्रभोज्योत सिंगवर प्राणघातक हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - कोलंबिया विद्यापीठातील शीख प्रोफेसर प्रभोज्योत सिंग यांच्यावर शनिवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला. त्यात सिंग गंभीर जखमी झाले. वर्णभेदातून ही कृती झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. हल्ला करणा-या काही व्यक्तींनी त्यांना ‘ओसामा’, ‘दहशतवादी’ असे संबोधले.

सिंग हे स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्समध्ये अध्यापनाचे कार्य करतात. सिंग यांच्यावर शनिवारी रात्री रस्त्यामध्ये हा हल्ला झाला. त्यात सिंग जखमी झाले आहे. त्यांच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली आहे. अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यानंतर शीख समुदायाला लक्ष्य करणा-या घटना वाढल्या आहेत.