आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शीतलहरीमुळे बोट बुडून ३०० निर्वासित बुडाले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोम - भूमध्य सागरात शीतलहरींमुळे बोट बुडून ३०० अधिक निर्वासित बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. सर्व नागरिकांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. ही बोट लिबियाहून इटलीकडे जात होती.

सुदैवाने प्रवासादरम्यान बचावलेले लोक किना-यावर आले आहेत. मात्र, अनेक रबर बोट्स अद्याप बेपत्ता आहेत. संयुक्त राष्ट्र निर्वासित एजन्सीच्या इटली येथील प्रवक्त्याने ही माहिती दिली. निर्वासित तीन बोटींनी इटलीच्या दिशेने येत होते, असे सूत्रांनी सांगितले.