आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूनंतरही व्हिडिओ चॅटिंग करा, सल्ला घ्या!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- आपली प्रिय व्यक्ती गेल्यावर आपणाला कायम रुखरुख वाटते. त्याच्याशी बोलता आले असते तर किती बरे झाले असते असे आपणाला कायम वाटत असते. नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन एका वेबसाइटने मृत व्यक्तींचे आभासी अवतार तयार करून त्यांच्याशी व्हिडिओ चॅट करण्याची अफलातून सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या वेबसाइटवर आपला अवतार तयार करून अजरामर राहण्याची संधीही ‘जाण्याच्या’ वाटेवर असलेल्यांना मिळाली आहे.

मॅसेच्युसेट्स तंत्रज्ञान संस्थेच्या उद्यमशीलता विकास कार्यक्रमांतर्गत अभियंते, डिझायनर्स आणि व्यावसायिकांनी एकत्र येऊन www.Eterni.me ही वेबसाइट तयार केली आहे. ‘बस्स, अमर व्हा’ (सिम्पली बिकम इम्मॉर्टल) असे घोषवाक्य असलेल्या या वेबसाइटवर मृत झालेली व्यक्ती डिजिटलदृष्ट्या पुन्हा साकारली जाऊ शकते, असा दावाही वेबसाइट विकसित करणार्‍या टीमने केला आहे.

24 तासांत 1300 इमेल
ही वेबसाइट ऑनलाइन जाताच अवघ्या 24 तासांतच 36000 नेटकर्‍यांनी हे वेबपेज पाहिले आणि 1300 नेटकर्‍यांनी नोंदणीची विनंती करणारे इमेलही पाठवले आहेत. विशेष म्हणजे या वेबसाइटवरील नोंदणीला प्रतीक्षा यादी आहे.

तुमच्याच स्टाइलमध्ये सल्लामसलत!
तुमच्या जीवनात तुम्ही जे जे केले असेल ते ते सर्व ही वेबसाइट एकत्रित करते आणि जटिल कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून या प्रचंड माहितीवर प्रक्रिया करते. त्यातून तुमची आभासी प्रतिमा तयार केली जाते. तुमच्या प्रतिमेसारखाच अगदी हुबेहूब अवतार! हा अवतार तुमचे निधन झाल्यानंतर संवाद साधतो, तुम्हाला माहिती देतो आणि तुमचे कुटुंब किंवा मित्रांना सल्लाही देतो. भूतकाळातील हे स्काइप चॅटप्रमाणेच आहे.

अशी केली जाते अवतार निर्मिती
एखाद्या मृत व्यक्तीचा अवतार पुन्हा हुबेहूब उभा करायचा असेल तर त्या व्यक्तीचे चॅट लॉग्स, सोशल नेटवर्कची माहिती, छायाचित्र आणि इमेल ही माहिती या बेवसाइटला पुरवावी लागते. या माहितीच्या आधारे त्या मृत व्यक्तीच्या स्मृती आणि वर्तन व्यवहाराची पुनर्निर्मिती केली जाते.