आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Video Game To Help Children Come Out Of Negative Mindset

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलांच्या नैराश्यावर व्हिडिओ गेम उतारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- किशोरवयीन मुलांचे नैराश्य झटकून टाकणारा एक अनोखा व्हिडिओ गेम तयार केल्याचा दावा न्यूझीलंडच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. ‘स्पार्क्स’ नावाचा हा व्हिडिओ गेम ‘कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी’चा वापर करून मुलांना नैराश्यावर मात करायला शिकवतो, असे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
हा गेम खेळणा-यांना एका योद्ध्याच्या भूमिकेत शिरून नकारात्मक विचार अग्निबाणांनी नष्ट करावे लागतात. तसेच निराशा आणि दु:खाच्या दलदलीत रुतत चाललेले जग वाचवण्याचा प्रयत्नही करायचा असतो. या प्रकल्पाच्या प्रमुख आणि आॅकलंड विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ सॅली मेरी यांनी सांगितले की, मानसिक समस्या जीवघेणे रूप धारण करण्यापूर्वीच त्यावर या गेमच्या मदतीने उपचार करता येतात. ही उपचार पद्धती गमतीदार करण्याचा आमचा उद्देश आहे. किशोरवयीन मुले या गेमच्या मदतीने खासगीरीत्या आपल्या समस्या मांडू शकतात आणि त्यावरील उपायही शोधू शकतात.
एका ब्रिटिश वैद्यकीय नियतकालिकाने केलेल्या तपासणीत आढळून आले की, पारंपरिक समुपदेशनाप्रमाणेच स्पार्क्समुळे अल्प ते मध्यम स्वरूपाच्या नैराश्यावर प्रभावीरीत्या मात करता येते. समोरासमोरील उपचार पद्धतीला पर्याय म्हणून ही पद्धत वापरता येईल. खासकरून जेथे मानसिक आजारांवर आरोग्य सेवा उपलब्ध नसतात अशा ग्रामीण भागांत ही पद्धत उपयुक्त ठरेल, असेही या नियतकालिकाने म्हटले आहे.
या खेळात सात पायºया असून प्रत्येक पायरी 35 ते 40 मिनिटांची आहे. समुपदेशनाच्या एका बैठकीचा कालावधीही इतकाच असतो. 13 ते 17 वयोगटातील मुलांमध्ये पौगंडावस्थेतील नैराश्याला सुरुवात होते. त्यांच्यासाठीच विशेषकरून हा गेम तयार करण्यात आला आहे.
संयुक्त राष्टÑसंघाच्या जागतिक शिखर पुरस्कार सोहळ्यात या गेमने नावीन्यपूर्ण उपक्रमाचा पुरस्कार पटकावला असून, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि आॅस्ट्रेलियासारख्या देशांना या गेमने भुरळ पाडली आहे. इंग्रजीतील हा गेम भाषांतरित करण्याचाही काही देशांचा विचार आहे, असेही या नियतकालिकाने म्हटले आहे.