आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Video Of Man Gets Caught Looking Girl Falls Off Treadmill

तिच्याकडे पाहून त्याचा तोल गेला, फजिती होऊ नये म्हणून पाहा तो कसा सावरला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिममध्ये ट्रेडमिलवर धावण्याचा सराव करत असताना एक युवक जवळून जात असलेल्या महिलेकडे पाहाण्यासाठी वळला आणि ट्रेडमिलवरुन खाली पडला. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

युवक शेजारून जात असलेल्या महिलेकडे पाहाण्यात दंग झाला आणि आपण ट्रेडिमिलवर उभे असल्याचा विसरला. महिलेकडे वळून पाहात असताना तो खाली कोसळला. मात्र, खाली पडल्यानंतर त्याने स्वतःला सावरत कोणी त्याच्याकडे पाहाण्याच्या आत पुशअप्स सुरु केले. ज्या महिलेकडे पाहात असल्यामुळे तो खाली कोसळला तिनेही पडल्याचा आवाज ऐकल्यानंतर वळून पाहिले तर, युवक पुशअप्स करत होता. त्याच्या या समयसुचकतेने त्याची फजिती झाली नाही, मात्र इंटरनेटवर हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने तो पुशअप्स करत नव्हता तर, ट्रेडमिलवरुन पडला होता हे सर्वांना माहित झाले आहे.
हा व्हिडिओ कुठला आहे आणि तो युवक कोण आहे, या बद्दल अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, 12 डिसेंबर रोजी युट्यूबवर हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत सात लाख लोकांनी तो पाहिला आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कसा पडला युवक