आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vietnam Defeated America Due To Shivaji Maharaj Ganimi Kawa

शिवाजी महाराजांच्या धोरणांच्या बळावर व्हिएतनामने केली होती अमेरिकेवर मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिएतनाम युद्ध अगदी काही तासांत जिंकता येईल असे अमेरिकेला वाटले होते. त्यासाठी तशा स्वरुपाची तयारी करण्यात आली होती. एकिकडे सुपरपावर अमेरिकेचे बलाढ्य लष्कर तर दुसरीकडे कमकुवत व्हिएतनामचे मोजकेच सैनिक होते. पण व्हिएतनामी लोकांची लढवय्यी वृत्ती आणि शिवाजी महाराजांच्या गनीमी काव्याचा पुरेपूर वापर यांच्या बळावर जोरदार संघर्ष उभा राहिला. अखेर अमेरिकेला माघार घ्यावी लागली. व्हिएतनामी जनतेचा, तेथील सरकारचा विजय झाला.
अमेरिकेच्या बलाढ्य लष्कराचा थेट सामना करणे व्हिएतनामच्या सैन्याला काही शक्य नव्हते. त्यामुळे व्हिएतनामी लष्कराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनीमी काव्याचा सखोल अभ्यास केला होता. त्यानंतर युद्धनितीत सकारात्मक बदल केले होते. व्हिएतनामची भूमी गनीमी काव्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे अमेरिकेच्या लष्कराला जागोजागी मोठी हानी सहन करावी लागली. व्हिएतनामवर पूर्णपणे विजय मिळवता आला नाही. अखेर दररोज होणारे प्रचंड लष्करी नुकसान बघून माघार घेण्याचा निर्णय घेतला. युद्धानंतर व्हिएतनामच्या राष्ट्रध्याक्षांनी शिवाजी महाराजांच्या गनीमी काव्याचा या युद्धात आम्ही वापर केल्याची कबुली दिली होती.
व्हिएतनाम, लाओ आणि कंबोडियाच्या भूमिवर सुमारे 20 वर्ष हे युद्ध लढले केले. सुरवातील उत्तरेकडील व्हिएतनाम आणि दक्षिणेकडी व्हिएतनाममध्ये युद्ध झाले. उत्तर व्हिएतनामच्या बाजूला कम्युनिस्ट समर्थक देश होते तर दक्षिण व्हिएतनामला अमेरिकेसारख्या कम्युनिस्ट विरोधी देश होते. दिसेंबर 1956 पासून एप्रिल 1975 पर्यंत हे युद्ध चालले.
या युद्धात अमेरिका खऱ्या अर्थाने 9 फेब्रुवारी 1965 रोजी उतरली. उत्तर व्हिएतनामचे नेतृत्व हो ची मिन्ह करीत होते. 1969 मध्ये या युद्धाने गंभीर स्वरुप प्राप्त केले होते. अमेरिकेने चक्क पाच लाखांचे लष्कर या युद्धात उतरवले होते. परंतु, नित्याच्याच हिंसाचाराने त्रस्त झालेल्या अमेरिकी जनतेने सरकारवर दबाव निर्माण केला. शिवाय व्हिएतनाम झुकण्यास तयार नव्हता. अखेर अमेरिकेने परत जाण्याचा निर्णय घेतला.
पुढील स्लाईडवर बघा, व्हिएतनाम युद्धाचे भीषण फोटो... या युद्धात अतिशय दुबळ्या व्हिएतनामने बलाढ्य अमेरिकेला दिली होती मात...