आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vietnam Instigator Of Monkey Torture Photos Fired From Military ‎

माकडाचा छळ केल्याप्रकरणी तीन सैनिक बडतर्फ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हनोई - व्हिएतनामच्या लष्कराचे सैनिक अस्तित्व धोक्यात असलेल्या प्रजातींपैकी दोन माकडांचा छळ करत असल्याची छायाचित्रे फेसबुकवर प्रसिद्ध झाल्यानंतर लोकांकडून तीव्र संताप व्यक्त होऊ लागताच त्यांना लष्करी सेवेतून तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले आहे.
दुर्लभ प्रजातीच्या माकडाचा छळ केल्याप्रकरणी तीन सैनिकांना तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले असून अन्य आठ सैनिकांना इशारा देण्यात आला आहे, असे पीपल्स आर्मी या वृत्तपत्रात म्हटले आहे. या सैनिकांनी राखाडी रंगाची माकडे गावक-यांकडून विकत घेतली आधी त्यांच्यावर अत्याचार केले व नंतर गावक-यांना पैसे देऊन कापून त्यांची भाजी तयार करायला लावली. त्यांच्यापैकी एका सैनिकाने ही छायाचित्रे फेसबुकवर टाकल्यावर हा सगळा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी तीन गावक-यांना अटक करण्यात आली आहे.