आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vijay Seshadri Wins 2014 Pulitzer Prize For Poetry News In Divya Marathi

भारतीय वंशाचे विजय शेषाद्रींना ‘पुलित्झर’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - भारतीय वंशाचे विजय शेषाद्री यांना यंदाच्या पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बंगळुरूत जन्मलेल्या विजय यांना ‘थ्री सेक्शन’ या कविता संग्रहासाठी गौरविण्यात आले आहे. द गार्डियन आणि वॉशिंग्टन पोस्टला पब्लिक सर्व्हिस र्शेणीतील पुरस्कार संयुक्तरित्या देण्यात आला आहे. ब्रेकिंग न्यूज रिपोर्टिंगसाठी बोस्टन ग्लोबच्या स्टाफची निवड झाली आहे. इन्व्हेस्टिगेटिंग रिपोर्टिंगसाठी सेंटर फॉर पब्लिक इंटीग्रिटीच्या क्रिस हॅम्बी यांचा सन्मान झाला आहे. यंदा फिचर रायटिंगमध्ये कोणालाही पुरस्कार नाही.

याआधी चार भारतवंशींना पुरस्कार : यापूर्वी भारतीय वंशाच्या चार प्रमुख लोकांना पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. यात गोविंद बिहारी लाल यांना पत्रकारितेसाठी 1937 मध्ये सन्मानित करण्यात आले.

1912 मध्ये ते गुरु गोविंद साहेब स्कॉलरशिपवर कॅलिफोर्निया विद्यापीठात गेले होते. पुढे सॅन फ्रान्सिस्को एक्झामिनरचे संपादक झाले. 1967 मध्ये जन्मलेल्या भारतीय लेखिका झुंपा लाहिरी यांना फिक्शन प्रकारासाठी इंटरप्रिटर्स ऑफ मेलडीज या पुस्तकासाठी 2000 मध्ये हा सन्मान मिळाला होता. मूळ बंगाली असलेल्या या लेखिका सध्या प्रेसिडेंट कमिटी ऑन आर्ट्स अँड ह्य़मॅनिटीजच्या सदस्य आहेत. राष्ट्रपती बराक ओबामा यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.

2003 मध्ये गीता आनंद यांना हा पुरस्कार मिळाला. वॉल स्ट्रीट र्जनल तथा बोस्टन ग्लोबमध्ये त्या लिहित असत. 2011 मध्ये सिद्धार्थ मुखर्जी यांना हा पुरस्कार मिळाला. मुखर्जी एमडी पीएच.डी. तथा कॅन्सरतज्ज्ञ आहेत.