आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Villagers Come Together And Starts Mobile Service In Mexico

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेक्सिकोत ग्रामस्थांनी एकत्र येऊन सुरू केली मोबाइल सेवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विला तालेआ दे कास्त्रो - मेक्सिकोतील एका छोट्या गावातील ग्रामस्थांनी स्वबळावर मोबाइल नेटवर्क निर्माण केले आहे. या ठिकाणी केवळ मोबाइल सेवा नव्हे, तर आंतरराष्‍ट्रीय संपर्क यंत्रणाही उपलब्ध आहे. विला तालेआ दे कास्त्रो असे या गावाचे नाव असून देशातील दक्षिण राज्य ओक्साकामध्ये ते आहे.


देशातील सर्वात मोठ्या मोबाइल ऑपरेटर कंपन्यांनी या गावातील मोबाइल सेवेकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष केले होते. येथील मोबाइल सेवा स्थानिक चलनात दरमहा 15 पेसोमध्ये (साधारण 75 रुपये) उपलब्ध आहे. देशाची राजधानी मेक्सिको सिटीमधील कोणत्याही मोठ्या मोबाइल कंपनीच्या बेसिक प्लॅनपेक्षा हा 13 पट स्वस्त आहे. ग्रामस्थांनी या मोबाइल कंपनीचे नाव रेड सेल्युलर दे तालेआ ठेवले आहे.


थोड्या पैशात होते बोलणे
येथील अनेक नागरिक अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. गावातील लोक अमेरिकेतील नातेवाइकांशी काही पैशात कॉल करतात. येथे पिवळ्या व गुलाबी रंगाची मोजकीच घरे असून येथील लोकसंख्या केवळ 2500 आहे. बहुतांश लोक कॉफी शेती करतात.


बचतही, बातचीतही
एक रेस्तराँ व्यवस्थापक 60 वर्षीय रामिरो पेरेज म्हणाले, माझी दोन मुले गावाबाहेर पडलेली आहेत. मला आठवड्यातून किमान दोन-तीन वेळेस त्यांना बोलावे लागते. गावात मोबाइल सेवा सुरू झाल्याने आपली खूप बचत झाल्याचे ते सांगतात.


सुरुवातीस 50 रुपये/ मिनिट : गावात मोबाइल सेवा नव्हती तेव्हा येथील नागरिकांना टेलिफोन बूथचा वापर करावा लागत होता. त्या वेळी त्यांना एका कॉलसाठी 10 पेसो (म्हणजे 50 रुपये प्रतिमिनिट) द्यावे लागत होते.