आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मशिद अध्यक्षाच्या हत्येवरून कराचीत हिंसाचार; 12 जण ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानची राजधानी कराचीतील नजीमाबाद येथील गोल मार्केट परिसरातील एका मशिदीच्या समितीच्या अध्यक्षाची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर काही क्षणांत या घटनेचे सर्वत्र हिंसक पडसाद उमटले. काही भागात जाळपोळही झाली. आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. पोलिस आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी छापासत्र सुरु केले असून सात जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

पोलिस विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यू कराची भागात एका अज्ञात व्यक्तीने ऑटो रिक्षेवर केलेल्या गोळीबारात दोन व्यक्तिंचा जागीच मृत्यू झाला. अन्य एका घटनेत दोन पोलिसांचाही मृत्यू झाला आहे. गोळीबाराच्या दुसर्‍या घटनेत दोन राजकीय पुढारी, एक फळविक्रेतासह सात जण मृत्युमुखी पडले आहेत.

दरम्यान, कराची पो‍‍लिसांनी मंगळवारी 148 संशयीतांना अटक केली आहे.