आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Violence Over Charlie Hebdo In Karchi, Photo Journalist Injured

‘चार्ली हेब्दो’ वरून कराचीत धुमश्चक्री, फोटो जर्नलिस्ट जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर / कराची - ‘चार्ली हेब्दो’ च्या निषेधार्थ शुक्रवारी पाकिस्तानमध्ये कट्टरवाद्यांनी हिंसक आंदोलन केले. कराचीमध्ये जमात-ए-इस्लामीचे कार्यकर्ते आणि पोलिसांत जोरदार धुमश्चक्री उडाली. या वेळी हजारोंच्या संख्येने फ्रान्स दूतावासाच्या बाहेर जमा झाले होते. त्यात तीन जण गंभीर जखमी झाले.

गोळी आरपार
फ्रान्सच्या दूतावास कार्यालयाजवळ धुमश्चक्री सुरू असताना पोलिसांची एक गोळी फ्रेंच फोटो जर्नलिस्टला लागली. ही गोळी छातीजवळून आरपार गेली. परंतु नंतर त्याच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.