आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विस्कॉन्सिन गुरुद्वार्‍याच्या सदस्याची हत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओक क्रीक (विस्कॉन्सिन)- विस्कॉन्सिन गुरुद्वार्‍यातील गोळीबाराच्या दुर्दैवी घटनेला दोन आठवडेही उलटत नाहीत तोच याच गुरुद्वार्‍याच्या सदस्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. लागोपाठच्या या घटनेमुळे शीख समुदायावर शोक कळा पसरली आहे. दलबीरसिंग (वय 56) असे या सदस्याचे नाव आहे. विस्कॉन्सिन राज्यातील मिलवुकी शहरात बुधवारी रात्री दलबीर आणि त्याचा भाचा जतिंदरसिंग दुकान बंद करीत असताना काही धटिंगण लोक तिथे आले. त्यांनी थेट दलबीर यांच्या कानशिलावर बंदूक ठेवली. एवढय़ात दलबीर व जतिंदर यांनी त्यांना मागे ढकलून ते पुन्हा आत शिरले व त्यांनी शटर खाली ओढले. परंतु त्या धटिंगण लोकांपैकी एकाने गोळ्या झाडल्या. त्याची एक गोळी दलबीर यांना लागली. दरम्यान, या घटनेचा 5 ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेशी संबंध नाही असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दलबीर हे ओक क्रीक गुरुद्वार्‍याचे सदस्य होते, परंतु गोळीबाराच्या घटनेच्या दिवशी ते उपस्थित नव्हते.