आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vladimir Putin News In Marathi, Divya Marathi, Russian President

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची गर्लफ्रेंड मीडिया ग्रुपची प्रमुख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को - रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची ग्लॅमरस गर्लफ्रेंड देशातील सत्ताधारी माध्यम समूहाच्या अध्यक्षपदी विराजमान झाली आहे. अ‍ॅलिना काबायेवा (३१) असे तिचे नाव आहे. सोमवारी तिच्या नावाची घोषणा करण्यात आली. सरकारने दिलेली ही ऑफर अ‍ॅलिनाने स्वीकारली आहे.
हा समूह सत्ताधारी युनायटेड रशिया पार्टीचा समर्थन करणारा माध्यम समूह मानला जातो. यासंबंधी संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्याचे ितला कळवण्यात आल्याची माहिती नॅशनल मीडिया ग्रुपच्या प्रवक्त्या आेक्साना रझुमोव्हा यांनी िदली. अॅलनिाने टीव्ही वाहनि्यांवर काही कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले होते. ितला प्रसारमाध्यमांच्या व्यवस्थापनाचा काहीही अनुभव नाही. अॅलनिा जिम्नॅस्टिक खेळाडू आहे.

दरम्यान, २००८ मध्ये नॅशनल मीडिया ग्रुपची स्थापना करण्यात आली होती. त्यात पाश्चात्त्य देशांनी निर्बंध घातलेली बँक आॅफ रोसियाचे अध्यक्ष युरी कोव्हालचक यांचे वर्चस्व होते. अॅलनिा कोव्हालचक यांचे पुतणे किरील यांची जागा घेईल.

ितच्यासाठी पत्नीला सोडले
अॅलनिाच्या सौंदर्याने घायाळ झालेले पुतीन यांनी विवाहित पत्नीला गुपचूप घटस्फोट िदला. घटस्फोटानंतर ते अॅलनिाशी विवाह करणार असल्याचा दावा रशियन वृत्तपत्र ‘मॉस्कोव्हस्की करस्पाँडन्ट’ने २००८ मध्ये केला होता.

दावा अमान्य
अॅलनिासोबतच्या संबंधांचा दावा साफ खोटा असल्याचे सांगून पुतीन यांनी यासंबंधी बातमी देणाऱ्या वृत्तपत्राला फटकारले होते. वैयक्तिक आयुष्यात लुडबूड करू नये, अशी तंबीही िदली होती. तेव्हापासून प्रेमप्रकरणाची चर्चा होती.

ग्लॅमरस खेळाडू
अॅलनिा क्रीडा क्षेत्रात ग्लॅमरस खेळाडू म्हणून आेळखली जाते. २००४ मध्ये ितने ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला सुवर्णपदक िमळवून दिले होते. युरोपियन आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांतही ितने देशाचा लौकिक वाढवला होता.

टीव्हीवर नियंत्रण
एनएमजीचे मुख्य काम देशातील टीव्ही माध्यमांना नियंत्रित करण्याचे आहे. युक्रेनप्रश्नी देशातील टीव्ही उद्योगाने सरकारच्या धोरणांचा प्रचार-प्रसार करावा, यावर निगराणी ठेवण्याचे काम एनएमजी अलीकडे करताना िदसून येत आहे. रेन टीव्ही, चॅनल ४ त्याशिवाय इज्वेस्टिया आणि टोवइ डेन, रेडिआे केंद्र रसकाया स्लुझ्बा नोव्होस्तेई यावरही समूह निगराणी ठेवतो.