आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियात राष्ट्रपती पुतीन यांच्याविरोधात निदर्शने, युक्रेनमध्ये संघर्ष सुरूच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिएव्ह/मॉस्को- रशियाने युक्रेन प्रकरणात हस्तक्षेप करू नये, यासाठी रशियाच्या सुमारे 50 हजार नागरिकांनी राजधानी मॉस्कोमध्ये राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात निदर्शने केली. दुसरीकडे, युक्रेनमधील हिंसाचार वाढल्याने शनिवारी तिघांचा मृत्यू झाला. यात एका रशियन नागरिकाचा समावेश आहे.

युक्रेनच्या क्रिमियात रविवारी सार्वमत घेतले जाणार असून या वेळी जनता रशियात विलीनीकरणाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि युरोपीय संघातील देशांनी मात्र हे बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. युक्रेनचे
काळजीवाहू राष्ट्रपती ओलेव्हसांद्र तुर्चिनोव्ह यांनी दानेस्क, खारकिव्ह तथा युक्रेनच्या अन्य भागातील हिंसाचारासाठी रशियाला दोषी धरले आहे. क्रिमियावर ताबा मिळवल्यानंतर रशिया युक्रेनच्या पूर्वोत्तर भागावर हल्ला करू शकतो, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. रशियाची राजधानी मॉस्कोत 50 हजार लोकांनी रशिया आणि युक्रेनचे झेंडे दाखवून राष्ट्रपती पुतीन यांचा विरोध केला.