आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vladimir Putin Said That Edward Snowden Is Here But Not Be Handed Over To Us

एडवर्ड स्नोडेनची ‘त्रिशंकू’ अवस्था

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को/ क्वालालंपूर - अमेरिकेची हेरगिरी उघडकीस आणून जगभरात खळबळ उडवून देणारा एडवर्ड स्नोडेन याची अवस्था ‘त्रिशंकू ’राजाप्रमाणे झाली आहे.राजाश्रयासाठी डोळे लावून बसलेल्या इक्वेडोरने अमेरिकेच्या भयापोटी हात वर केले असून स्नोडेनला आता एकतर रशियाच्या विमानतळावर मुक्काम करावा लागेल अथवा व्हेनेझुएलात आश्रयासाठी वाट पाहत बसावे लागणार आहे. दरम्यान, स्नोडेनला कुठे राजाश्रय मिळेल यावर ब्रिटनमध्ये सट्टेबाजी सुरु झाली आहे.
बुधवारी सलग चौथ्या स्नोडेन मॉस्कोच्या शेरेमेत्येवो विमातळावरच मुक्कामी होता.मॉस्कोहून तो कुठे जाणार याबाबत अद्यापही गूढच आहे. रशियाने त्याचे अमेरिकेकडे प्रत्यार्पण करण्यास नकार दिल्यामुळे त्याला दिलासा मिळाला आहे.रशियातून त्याची हकालपट्टी करण्यासाठी कायदयाचाही हवाला अमेरिकेने दिला.परंतु राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी तो फेटाळून लावला होता.तर त्याला आश्रय दिल्यास अमेरिकेसोबतचा व्यापार व निर्यातीवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असल्याने इक्वेडोरने त्याला आश्रय देण्यास जवळपास नकारच दिला आहे. त्याच्या राजाश्रयाच्या निर्णयास अनेक महिने लागतील असे परराष्ट्रमंत्री रिकार्दो पॅतिनो यांनी सांगितले.
व्हेनेझुएलाबद्दल आशा
व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो योगायोगाने पुढील आठवड्यात उर्जा परिषदेसाठी रशियाच्या दौºयावर येत आहेत. त्यावेळी स्नोडेनच्या राजाश्रयाच्या विनंतीवर विचार होण्याची शक्यता आहे.

ब्रिटनमध्ये सट्टेबाजी
स्नोडेनच्या वास्तव्यावरुन ब्रिटनची बेटींग कंपनी विलीयम हिलने सट्टेबाजी सुरु केली आहे. त्याची तुलना ‘द टर्मिनल’ चित्रपटाशी होत आहे. त्यात अभिनेता टॉम हँक्सला विमातळावर मुक्काम करावा लागतो.