आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्लादिमिर पुतीनच्या वाघोबाने 15 शेळ्या केल्या फस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - रशियाचे अध्‍यक्ष व्लादिम‍िर पुतिन यांनी ईशान्य चीनमध्‍ये सोडलेल्या दुर्मिळ सैबेरियन वाघाने धुमाकूळ घातला आहे. चीनच्या हेलॉंगजियांग प्रांतातील फुऑनमधील 15 शेळ्या रशियाच्या वाघोबाने फस्त केल्या आहेत.अशी बातमी येथील सरकार वृत्तसंस्था शिन्हुआने दिले आहे. शेळ्यांचा मालक गुओ युलिन याने वृत्तसंस्थेला सांगितले,की सोमवारी सकाळी त्याला सर्व शेळ्या मृत अवस्थेत दिसल्या. शेळ्यांच्या शिरावर वाघाच्या दातांचे व्रण होते.
रशियात दोन वर्षांपूर्वी पाच वाघांच्या छाव्यांना वाचवण्‍या आले होते. त्यांची योग्य देखभाल करण्‍यात आली आणि या वर्षी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी तीन वाघांना सैबेरियात सोडून दिले.