आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Voilence In Bangladesh General Election, Two Hundred Voting Centre Burned

बांगलादेशमधील सार्वत्रिक निवडणूकीत हिंसाचार, दोनशेवर मतदान केंद्र पेटवले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - बहिष्कार, सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सर्मथकांतील धुमश्चक्री, हिंसाचार आणि मतदारांचा घसरलेला टक्का असे चित्र बांगलादेशमधील सार्वत्रिक निवडणुकीत रविवारी पाहायला मिळाले. निदर्शकांनी दोनशेवर मतदान केंद्रे पेटवून दिली. विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात 21 जण ठार झाले. हिंसाचाराची शंका असल्याने हजारो लोक घराबाहेरच पडले नाहीत. त्यामुळे केवळ 15 टक्के मतदान झाले.
बांगलादेशमधील सार्वत्रिक निवडणुकीत सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर हिंसाचार दिसून आला. निदर्शकांनी दोनशे मतदान केंद्रे पेटवून दिली. त्यात रात्री उशिरापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. रांगपूर, दिनाजपूर, निलफामारी, फेनी, मुंशीगंज या भागात विरोधकांनी रविवारी मतदान केंद्रांसमोर जोरदार निदर्शने केली. विरोधकांनी निवडणुकीवर अगोदरच बहिष्कार टाकला होता. देशातील 18 पक्षांनी सार्वत्रिक निवडणुकीला कडाडून विरोध केला. त्यामुळे अनेक मतदारसंघांत विरोधी पक्षाचे उमेदवार निवडणुकीत उतरले नाहीत.
त्या पार्श्वभूमीवर होऊ घातलेल्या निवडणुकीमुळे देशातील मुख्य विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी ) सह सर्व विरोधी राजकीय पक्षांनी एकत्र येऊन सरकारच्या विरोधात ठिकठिकाणी निदर्शने केली. त्यातून मोठा हिंसाचार घडून आला. निवडणुकीसाठी 3 लाख 75 हजार सुरक्षा जवान तैनात ठेवण्यात आले होते. 50 हजार लष्करी फौजफाटाही सज्ज ठेवण्यात आला होता. परंतु हिंसाचार रोखण्यात मात्र त्यांना यश आल्याचे दिसले नाही.
>147 मतदारसंघांत मतदान. एकूण 300 मतदारसंघ.
>153 मतदारसंघांत बिनविरोध निवड
>04 कोटी 40 लाख मतदार
शून्य टक्के मतदान
देशातील 59 जिल्ह्यांत होणार्‍या निवडणुकीकडे मतदारांनी पाठ फिरवल्याने अनेक मतदान केंद्रांवर सायंकाळपर्यंत शब्दश: मतदान झाले नाही. त्यामुळे टक्केवारी शून्य टक्के राहिली. देशाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
एकतर्फी मामला
रविवारी 147 जागांसाठी मतदान झाले. त्यासाठी एकूण 390 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये सत्ताधारी अवामी लीग आणि सहकारी पक्ष जतिया पार्टीच्या उमेदवारांची संख्या अधिक होती. 153 जागांवर विरोधी उमेदवारच नसल्याने बिनविरोध निवड झाली