आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Waist Height Ratio Beats BMI For Gauging Early Death

फिटनेससाठी उंचीच्या तुलनेत कमरेचा घेर निम्मा ठेवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - एखाद्याच्या उंचीच्या प्रमाणात कमरेचा घेर मोजून बॉडी मास इंडेक्सपेक्षाही (बीएमआय)अचूक जीवनमानाचा अंदाज बांधता येतो, असे नव्याने करण्यात आलेल्या संशोधनात म्हटले आहे.

ऑक्सफर्ड ब्रुकीज विद्यापीठाने केलेल्या संशोधनात उंचीच्या तुलनेत कमरेचे माप घेऊन बीएमआयपेक्षा अधिक अचूक आयुर्मानाचा अंदाज बांधता येऊ शकत असल्याचे आढळून आले आहे. बीएमआयमध्ये व्यक्तीचे किलोग्राममधील वजनाला मीटरमधील उंचीच्या वर्गाने भागाकार करून आयुर्मानाचा अंदाज बांधण्यात येतो.

या संशोधनासाठी 1980 मध्ये बीआयएम आणि उंचीच्या तुलनेत कमरेच्या घेराचे प्रमाण मोजण्यात आले होते अशा रुग्णांचा डाटा वापरण्यात आला. 20 वर्षांनंतर शास्त्रज्ञांना बीआयएमपेक्षा उंचीच्या तुलनेत कमरेच्या घेराचा रेशो जास्त असलेल्या व्यक्तींमध्ये मृत्यूदराचे प्रमाण जास्त आढळून आले. विविध वयोगटातील व्यक्तींची उंची व कमरेचा आकार याची तुलना केल्यानंतर कमरेचा घेर वाढल्यानंतर आयुर्मानात किती घट होते, याचे मोजपाम करणे शास्त्रज्ञांना शक्य झाले आहे.

टाळता येतील दुर्धर आजार - एखाद्याच्या उंचीच्या तुलनेत कमरेच्या घेराचे माप अर्ध्यापेक्षा जास्त नसेल तर पक्षाघात, हृदयविकार आणि मधुमेहासारखे आजार टाळता येतात आणि अशा व्यक्तीचे आयुर्मानही वाढते, असे संशोधकांनी म्हटले आहे.

लवकरच मिळते धोक्याची सूचना - तुम्ही जर उंचीच्या तुलनेत कमरेचा घेर मोजला तर काही तरी चुकते आहे, हे लगेच लक्षात येते आणि धोक्याची सूचना मिळाल्यामुळे तुम्हाला खबरदारी म्हणून खूप लवकर काही तरी करणे शक्य होते.’’ डॉ. मार्गारेट अ‍ॅशवेल, संशोधक