आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Walmart Expend For Lobbying 32 Corere : Seneat\'s Report Expose

वॉलमार्टने लॉबिंगसाठी खर्च केले 32 कोटी : सिनेटच्‍या अहवालात माहिती उघड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन/नवी दिल्ली - रिटेल क्षेत्रातील प्रसिद्ध अमेरिकी कंपनी वॉलमार्टने 2012 मध्ये लॉबिंगवर 61.3 लाख डॉलर (सुमारे 32.60 कोटी रुपये) खर्च केले आहेत. यात भारतीय बाजारपेठेत थेट विदेशी गुंतवणुकीबाबतच्या (एफडीआय) चर्चेचाही समावेश आहे.

सिनेटला देण्यात आलेल्या अहवालातून ही माहिती उघडकीस आली आहे. यानुसार 31 डिसेंबरला संपलेल्या तिमाहीत वॉलमार्टने विविध मुद्द्यांवर लॉबिंगसाठी 14.8 लाख डॉलर (सुमारे 8 कोटी रुपये) खर्च केले. भारतीय बाजारपेठेत येण्यास उत्सुक असलेल्या वॉलमार्टने भारतात लॉबिंगसाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे अशाच एका अहवालातून उघडकीस आले होते. यानंतर केंद्र सरकारवर विरोधकांनी गंभीर आरोप केल्याने या प्रकरणी चौकशीसाठी समिती नेमण्याचा निर्णय डॉ. मनमोहनसिंग सरकारने घेतला आहे.आता पुन्हा वॉलमार्टचाच विषय समोर आल्याने नवा राजकीय वाद निर्माण होईल, असे मानले जाते.