आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wanted British White Widow Terrorist Killed Ukraine Claims Russian News Agency

ISIS साठी लढणारी मोस्ट वाँटेड \'व्हाइट विडो\' रशियन स्नायपरच्या गोळीने ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - दहशतवादी संघटना आयएसआयएससाठी लढणारी ब्रिटीश महिला दहशतवादी समांथा ल्यूथवेट मारली गेल्याचा दावा रशियाच्या वृत्तसंस्थेने केला आहे. समांथाला रशियाचा स्नायपरने मारल्याचे त्यात वृत्तसंस्थेने म्हटले आहे. ब्रिटनच्या मोस्ट वाँटेड यादीतील 30 वर्षीय समांथा 'व्हाइट विडो' नावाने कुख्यात होती. वृत्तसंस्थेने दावा केला आहे, की ज्या स्नायपरने समांथाला ठार केले आहे, त्याला रशिया सरकारने 10 लाख डॉलर देण्याची घोषणा केली आहे.
कोण आहे 'व्हाइट विडो'
'व्हाइट विडो' नावाने कुख्यात असलेल्या समांथाचे नावा नैरोबीमध्ये मृत्यू तांडव करणार्‍या दहशतवाद्यांमध्ये आले होते. 7 जुलै 2005 मध्ये लंडनमध्ये आत्मघातकी हल्ला करणार्‍या जर्मेन लिंडसे याची समांथा विधवा आहे. या हल्ल्यात 52 जणांचा मृत्यू झाला होता. रशिया वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, लंडनमधील हल्ल्यानंतर समांथा अंडरग्राउंड झाली होती. त्यानंतर 2011 मध्ये ती केनियाच्या मोम्बासा येथे असल्याचा सुगावा लागला. या दरम्यानच्या काळात ती सोमालियाची दहशतवादी संघटना अल-शबाबसोबत गेली होती आणि 'व्हाइट विडो' नावाने कुप्रसिद्ध झाली होती. 2013 मध्ये नैरोबी येथील मॉलमध्ये झालेल्या हल्ल्याची ती सूत्रधार होती.
दोन महिन्यांपूर्वी जॉइन केले ISIS
'व्हाइट विडो'ने दोन महिन्यांपूर्वी आयएसआयएस (इस्लामिक स्टेट) जॉइन केले आहे. सीरियामध्ये महिला आत्मघाती पथकाला प्रशिक्षण देण्याची महत्त्वाची जबाबदारी तिला देण्यात आली आहे. ब्रिटनची वेबसाइट डेली मेल च्या वृत्तात 'व्हाइट विडो' इस्लामिक स्टेटचे मुख्यालय रक्कामध्ये महिलांना प्रशिक्षण देतानेच्या छायाचित्रात दाखविले होते. आयएसआयएस जॉइन केल्ायनंतर या दहशतवादी संघटनेतील उच्चपदस्थ नेत्यांमध्ये तिचा समावेश करण्यात आला होता. गेल्या तीन महिन्यांपासून ब्रिटन, अमेरिका आणि केनिया येथील सुरक्षा यंत्रणा तिचा शोध घेत होते. काही वृत्तांमध्ये या सुरक्षा यंत्रणांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी तिने चेहर्‍याची प्लॅस्टिक सर्जरी केल्याचे म्हटले आहे.
पुढील स्लाइडमध्ये, 'व्हाइट विडो'ची छायाचित्र