आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्व युक्रेनमधील युद्धबंदीवर सहमती, रविवारपासून अंमलबजावणी होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिंस्क (बेलारूस) - युक्रेनमधील संघर्ष समाप्त करण्यासाठी बेलारूसची राजधानी मिंस्कमध्ये चार देशांतील नेत्यांनी १६ तास प्रदीर्घ चर्चा केली. यामध्ये पूर्व युक्रेनमध्ये युद्धबंदी लागू करण्यास सहमती दर्शवण्यात आली.

बैठकीत रशिया, युक्रेन, जर्मनी आणि फ्रान्सचे नेते सहभागी होते. बैठकीनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणाले, युद्धबंदी रविवारपासून लागू होईल. माझी रात्र चांगली नव्हती, मात्र सकाळ सुखद होती. अनेक मतभेदानंतरही ब-याच मुद्द्यांवर सहमती तयार करण्यात यश मिळाले.

पुतीन यांनी युक्रेनला पूर्व भागात घटनात्मक सुधारणा लागू करण्याचे आवाहन केले. असे असले तरी रशिया आणि युक्रेनमध्ये देबाल्तसेवच्या स्थितीचा आढावा घेण्याबाबत सहमती झाली नाही. यामध्ये युक्रेनच्या १६ सैनिकांसह ४२ जण ठार झाले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेंका यांनी पूर्व भागास स्वायत्तता देण्यास असहमती दर्शवली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी अजून खूप काही करणे बाकी असल्याचे सांगितले. आपण आणि जर्मन चान्सलर अँजेला मर्केल पूर्व युक्रेनमध्ये शांतता कायम ठेवण्यासाठी वचनबद्ध आहोत. ओलांद यांनी पुतीन यांची स्तुती करत ते फुटीरतावाद्यांवर दबाव टाकण्यात यशस्वी झाल्याचे सांगितले.