आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमान वाढीमुळे मानवी समूहाचे अस्तित्व धोक्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो - जागतिक तापमानातील बदलाबाबतचा अहवाल तयार करण्यासाठी जगभरातील हवामान विषयाचे शास्त्रज्ञ या आठवड्यात येथे जमा होत आहेत. तापमान वाढीची झळ केवळ पोलार बिअरसारख्या काही ध्रुवीय प्रदेशाला बसते, अशी धारणा असेल तर ती चुकीची आहे, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. पृथ्वीच्या तापमानवाढीचा धोका तत्काळ जाणवणारा आहे.

तापमानवाढीचा धोका गंभीर असून पोलार बिअर हे अमेरिका आहे, असे वातावरण विषयाचे शास्त्रज्ञ पॅट्रिसिया रोमेरो यांनी सांगितले. जागतिक तापमानवाढीमुळे बर्फ वितळण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे एक प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. वातावरण बदलाबाबत 60 शास्त्रज्ञांचे पथक अंतिम अहवाल तयार करणार आहेत. यामध्ये रोमेरो यांचा समावेश आहे. वातावरण बदलावरील जागतिक समितीने आयोजित केलेल्या बैठकीस 100 देशांच्या सरकारांना निमंत्रण देण्यात आले आहे.