आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Washingran's Sasha Digulian Starts Treking From 7 Years Old

वॉशिंग्टनच्या साशा डिगुलियनने सात वर्षांची असल्यापासून गिर्यारोहण करतेय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टनमधील 19 वर्षांच्या साशा डिगुलियनने सात वर्षांची असल्यापासूनच गिर्यारोहणाला सुरुवात केली. आज ती जगातील सर्वोत्कृष्ट महिला गिर्यारोहक बनली आहे. 5.14 डी ग्रेडेड हा सर्वात कठीण क्लायंबिंग रूट पार करणारी साशा सर्वात कमी वयाची महिला ठरली आहे. कठीणपेक्षाही अतिकठीण चढ ती लीलया पार करते. 18 व्या वर्षीच तिने जागतिक स्तरावरील पहिला पुरस्कार पटकावला. ती सलग तीन वर्षांपासून यूएस नॅशनल चॅम्पियन आहे. नीट चालता येण्यापूर्वी मी पर्वत चढायला शिकले, असे साशा म्हणते. लहान असताना फरशीवरून पलंगावर चढायला मजा वाटत होती. गिर्यारोहण हा प्रकार ऑ लिम्पिकमध्ये समाविष्ट व्हावा, अशी साशाची इच्छा आहे. जेणेकरून तिला त्यात सहभागी होता येईल. त्यासाठी तिने एक मोहीमही हाती घेतली आहे.

Gateway.ninemsn.com