आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वॉटरगेट उघड करणा-या ‘वॉशिंग्टन पोस्ट’ची अ‍ॅमेझॉनच्या बेझॉसकडून खरेदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - वॉटरगेट प्रकरण उघडकीस आणणारे वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्र विकण्यात आले आहे. आश्चर्यकारक घडामोडींनंतर अ‍ॅमेझॉनचे सीईओ जेफ्री पी. बेझॉस यांनी वृत्तपत्र खरेदी केल्याची घोषणा सोमवारी केली. 25 कोटी डॉलरमध्ये (1500 कोटी रुपये) हा सौदा झाला. बेझॉस स्वत: ते विकत घेत आहेत. त्यांची कंपनी अ‍ॅमेझॉनशी
त्याचा संबंध नसून ते त्यांच्या स्वत:च्या मालकीचे असेल. व्यवहार पूर्ण होण्यासाठी आणखी 60 दिवस लागणार आहेत.


1887 मध्ये 10 हजार प्रतींपासून या वृत्तपत्राची सुरुवात झाली होती. 1974 मध्ये वॉटरगेट प्रकरण उघडकीस आणून अमेरिकी राष्‍ट्रपतीला गुडघे टेकण्यास आगतिक करण्यापर्यंत या वृत्तपत्राच्या निर्भिड पत्रकारितेने धडाडी घेतली होती. बॉब वुडवर्ड आणि कार्ल ब्रेस्टीन यांच्या वृत्तामुळे राष्‍ट्रपती रिचर्ड निक्सन यांच्यावर महाभियोग चालवण्यात आला. अखेरीस त्यांना राजीनामाही द्यावा लागला होता. अमेरिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना होती.


80 वर्षांपासून ग्रॅहम परिवाराकडे
वॉशिंग्टन पोस्टने मंगळवारी विक्रीची घोषणा केली. वृत्तपत्राद्वारे जेफ्री बेझॉस प्रथमच वृत्तपत्रसृष्टीत पाऊल टाकत आहेत. गेल्या 80 वर्षांपासून ग्रॅहम परिवाराकडे या वृत्तपत्राची मालकी होती. या व्यवहारात बेझॉस मूळ कंपनी एक्स्प्लोर होल्डिंगच्या माध्यमातून वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्र आणि संबंधित व्हेन्चर्सही खरेदी करत आहेत.


वॉशिंग्टन पोस्टची वैशिष्ट्ये
- 47 पुलित्झर पुरस्कार मिळवले. 18 नीमॅन फेलोशिप्स मिळाल्या. 368 व्हाईट हाऊस न्यूज फोटोग्राफर्स असोसिएशन अवॉर्ड मिळाले.
- 1 जून 1933 रोजी लिलावात कॅलिफोर्नियातील फायनेंशियर यूझीन मेअरने ते 8.25 लाख डॉलरमध्ये खरेदी केले होते.
- राष्‍ट्रपती हॅरी ट्रूमेन यांनी युझीन यांना इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंटचे पहिले अध्यक्ष केले होते. तेव्हा हे वृत्तपत्र यूझीन यांची मुलगी कॅथरीनच्या हाती आले.
त्याचा संबंध नसून ते त्यांच्या स्वत:च्या मालकीचे असेल. व्यवहार पूर्ण होण्यासाठी आणखी 60 दिवस लागणार आहेत. 1887 मध्ये 10 हजार प्रतींपासून या वृत्तपत्राची सुरुवात झाली होती. 1974 मध्ये वॉटरगेट प्रकरण उघडकीस आणून अमेरिकी राष्‍ट्रपतीला गुडघे टेकण्यास अगतिक करण्यापर्यंत या वृत्तपत्राच्या निर्भीड पत्रकारितेने धडाडी घेतली होती. बॉब वुडवर्ड आणि कार्ल ब्रेस्टीन यांच्या वृत्तामुळे राष्‍ट्रपती रिचर्ड निक्सन यांच्यावर महाभियोग चालवण्यात आला. अखेरीस त्यांना राजीनामाही द्यावा लागला होता. अमेरिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना होती.
80 वर्षांपासून ग्रॅहम परिवाराकडे : वॉशिंग्टन पोस्टने मंगळवारी विक्रीची घोषणा केली. वृत्तपत्राद्वारे जेफ्री बेझॉस प्रथमच वृत्तपत्रसृष्टीत पाऊल टाकत आहेत. गेल्या 80 वर्षांपासून ग्रॅहम परिवाराकडे या वृत्तपत्राची मालकी होती. या व्यवहारात बेझॉस मूळ कंपनी एक्स्प्लोर होल्डिंगच्या माध्यमातून वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्र आणि संबंधित व्हेंचर्सही खरेदी करत आहेत.


वॉशिंग्टन पोस्टची वैशिष्ट्ये
47 पुलित्झर पुरस्कार मिळवले. 18 नीमॅन फेलोशिप्स मिळाल्या. 368 व्हाइट हाऊस न्यूज फोटोग्राफर्स असोसिएशन अवॉर्ड मिळाले.
1 जून 1933 रोजी लिलावात कॅलिफोर्नियातील फायनेंशियर यूझीन मेअरने ते 8.25 लाख डॉलरमध्ये खरेदी केले होते.
राष्‍ट्रपती हॅरी ट्रूमेन यांनी युझीन यांना इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंटचे पहिले अध्यक्ष केले होते. तेव्हा हे वृत्तपत्र यूझीन यांची मुलगी कॅथरीनच्या हाती आले.


विक्रीमागील कारणे
इंटरनेट युगात जाहिरात घटल्याने नफा कमी झाला.
प्रिंटचा दबदबा इंटरनेटवर राखू शकले नाही.
ग्रॅहम यांनी स्टाफला डिजिटल ऑपरेशनपासून दूर ठेवले.
2001 ते 10 या काळात वितरणात 1.20 लाखाची घट.
तीन वर्षांत पेड सर्क्युलेशन 14 टक्के घटले.