आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wasin Akram To Tie Knot With Australian Pr Consultant Shaniera Thompson

अक्रम दुस-या लग्नाला राजी, सुश्मिता नाही तर ऑस्ट्रेलियन पीआर कन्सल्टंट होणार बेगम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम पुन्हा एकदा प्रेमात पडला असून यावेळी तो या प्रेमाला लग्नापर्यंत घेऊन जाणार आहे. वसीमच्या कौटूंबिक सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याने मेलबर्नच्या शॅनेरा थॉमसनला लग्नाची मागणी घातली आहे आणि तिनेही होकार कळविला आहे. हे दोघे या वर्षाच्या शेवटी लग्न करणार आहेत. मात्र, या बातमीने बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनच्या चाहात्यांचे मन खट्टू झाले आहे. वसीम आणि सुश्मिताच्या लग्नाच्या बातम्या अनेक वर्षांपासून चर्चेत होत्या.

सुश्मितासह अक्रमचे नाव पाकिस्तानच्या एका मॉडेलशीही जोडले गेले होते. मात्र, त्याने कायम मुलांच्या संगोपनाला प्राथमिकता दिली होती. तो म्हणायचा की, मला माझ्या दोन्ही मुलांकडे लक्ष द्यायचे आहे. यावेळी मात्र, तो शॅनेराकडून क्लिनबोल्ड झाला आहे.

पुढील स्लाइडमध्ये, सुश्मिता आणि अक्रमने लग्नाबद्दल काय सांगितले होते.