आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइनवर वेळ वाया घातल्यास विजेचा झटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला तासन्तास ऑनलाइन बसण्याची सवय असेल तर त्यावर एक नवा उपाय आला आहे. मेसाच्युसेट्स तंत्रज्ञान संस्थेतील रॉबर्ट मॉरिस आणि डॅन मॅकडफ या दोन विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे उपकरण तयार केले आहे. अधिक वेळ ऑनलाइन असल्यास या उपकरणाद्वारे तुम्हाला विजेचा झटका दिला जाईल. पावलोव नावाचे हे उपकरण तुमच्या अँप्लिकेशनच्या वापरावर लक्ष ठेवून असेल. तुम्ही खूप काळ फेसबुकसारख्या साइटवर असाल तर हे संगणकाला जोडलेले हे उपकरण की-बोर्डद्वारे तुमच्या हातांना विजेचा झटका देईल. उपकरण तयार करणारे विद्यार्थी सांगतात की, एकदा त्यांनी आठवड्यातील 50 तास फेसबुकवर घालवले, या वेळी त्यांना हे उपकरण तयार करण्याची युक्ती सुचली. 1 gizmodo.com