आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चष्म्याविना टीव्हीवर पाहा थ्रीडीचा थरार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- घरबसल्या थ्रीडी चित्रपटाचा थरार अनुभवताना डोळ्यावर बोजड कंटाळवाणा गॉगल वापरण्याची आता गरज नाही. थेट उघड्या डोळ्यांनी तुम्ही हा थरार पाहू शकाल. टीव्ही तंत्रज्ञानातील हा नवा आविष्कार पुढील महिन्यात बर्लिन येथे होणार्‍या व्यापार मेळाव्यात सादर होत आहे.
फ्रॉनहॉफर इन्स्टिट्यूट, हेन्रिच-हर्टझ् इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी या तंत्रज्ञानाचा विकास केला असून 'नील किरणांना' मूळ थ्रीडी स्वरूपात परिवर्तित करून त्या प्रतिमांची परिणामकारकता टीव्हीच्या पडद्यावर सिद्ध करण्याची क्षमता यात आहे. त्यामुळे थ्रीडी चित्र थेट उघड्या डोळ्यांनी दिसू शकेल. घरी सोफ्यावर आरामशीर रेलून टीव्हीवर चालू असलेल्या चित्रपटाचा आनंद घेणारी मंडळी कमी नाहीत. मात्र तोच चित्रपट थ्रीडी असेल तर मात्र डोळ्यांवरील गॉगल सांभाळत अवघडत बसून राहण्याने आनंदावर विरजण पडल्यासारखे व्हायचे. यातून सिनेशौकिनांची आता सुटका होईल, असे संशोधकांनी म्हटले आहे. बर्लिनमध्ये पुढील महिन्यात सादरीकरणानंतर काही महिन्यांतच हा टीव्ही बाजारपेठेत येईल.
वैशिष्ट्य काय?- आजवर टीव्हीवर थ्रीडी तंत्रज्ञान वापरले जात असताना प्रतिमांचे किचकट मॅपिंग मंद गतीने होत असे. नव्या तंत्रज्ञानात ते वेगाने होईल. हा डाटा वेगाने परिवर्तित व्हावा म्हणून एक सॉफ्टवेअर तयार केले आहे.
अडचण कोणती येईल : सध्याच्या थ्रीडी इमेजचा कंटेंट नील किरणांवर (ब्लू रेज) आधारित आहे. यात दोन प्रतिमा वापरण्यात येतात. प्रत्येक डोळ्याची एक प्रतिमा असे हे तंत्र कार्य करते. यातून थ्रीडी इफेक्ट जाणवतो. यासाठी ठरावीक अंतरावर बसणे किंवा विशिष्ट कोनातून तो पाहणे या र्मयादा आहेत. थ्रीडी गॉगलने कोणत्याही अँगलमधून स्क्रीन पाहू शकतो. गॉगल न घालता ही सुविधा मिळणार नाही.
टीव्ही स्क्रीन उपलब्ध- नवे तंत्रज्ञान वापरून थ्रीडी प्रतिमा दाखवण्याची क्षमता असलेले थ्रीडी स्क्रीन मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असून ग्राहकांना त्यासाठी तो बाजारात कधी येईल, याची वाट पाहण्याची गरज नाही.