आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापॅरिस - लोकसंख्या व अर्थव्यवस्थेचा विस्तार पाहता नजीकच्या काळात जगासमोर पाणी व विजेच्या दुहेरी संकटाची भीषणता जाणवणार आहे. आगामी दशकांतील हे भयंकर चित्र असेल, असा इशारा संयुक्त राष्ट्राने दिला आहे.
जागतिक जल दिनाच्या पूर्वसंध्येला संयुक्त राष्ट्राने पृथ्वीवरील या भीषण समस्येचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी संयुक्त राष्ट्राच्या वतीने एक अहवाल जाहीर करण्यात आला असून यात ही माहिती देण्यात आली.
आशिया खंडावर गडद ढग : पाण्याची मागणी आणखी चार दशकांत प्रचंड वाढेल. 2050 मध्ये त्यात 55 टक्क्यांनी वाढ होईल. त्यातही आशिया खंडाची स्थिती अधिक भीषण होऊ शकते, असा इशारा अहवालात देण्यात आला आहे. 2035 पर्यंत भारत, चीन आणि मध्य-पूर्वेकडील देशांतील विजेच्या मागणीत 60 टक्क्यांनी वाढ होऊ शकते, असे अहवालात म्हटले आहे.
पृथ्वीवर 75 टक्के पाणी, पिण्यायोग्य 1 टक्काच
पृथ्वीवर एकूण 75 टक्के पाणी आहे. यातील 97.5 टक्के पाणी सागरात सामावले आहे. 2.5 टक्के ताज्या पाण्यापैकी 70 टक्के बर्फाच्या स्वरुपात तर 30 टक्के भूजल आहे. या भूजलापैकी फक्त 1 टक्का पाणी आपल्या उपयोगाचे.
स्वच्छ पाण्याची निकड वाढणार
सिंचन, पिणे, सांडपाणी इत्यादीसाठी स्वच्छ पाण्याची मागणी नजीकच्या दशकात मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. त्यात बांधकाम, गटारांची स्वच्छता इत्यादींसाठीदेखील स्वच्छ पाण्याची मागणी वाढणार असल्याने त्याचा तुटवडा जाणवणार आहे. तीच बाब विजेचीदेखील आहे, असे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.