आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चंदामामाच्या अतिप्राचीन खडकावर आढळले पाणी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - चंद्रावरील अतिप्राचीन खडकावर पाण्याच्या अस्तित्वाचे पुरावे आढळून आले आहेत. हा भाग अत्यंत चकचकीत स्वरूपाचा असून तेथेच पाण्याचे अस्तित्व शोधण्यात आल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

चांद्र संशोधनातील हा पुढचा टप्पा आहे. चंद्र अस्तित्वाला येण्याआधी त्यावर पाणी होते. त्या प्रक्रियेतही पाण्याचे अस्तित्व होते. चंद्रावरील डोंगराळ भूप्रदेश त्याच्या अस्तित्वाच्या वेळी असलेल्या परिस्थितीचे प्रातिनिधिक रूप आहे. लाव्हा रसाच्या समुद्राचे घनपदार्थामध्ये रूपांतर झाले. ही प्रक्रिया चंद्राच्या सुरुवातीच्या काळात घडली असावी, असे मिशिगन विद्यापीठाच्या संशोधनात म्हटले आहे. चांद्र मोहिमेतील नमुन्यांच्या अभ्यासानंतर हा दावा केला आहे.
चंद्रावरचा हा खडक डोंगराचा भाग असून तो स्फटिकाप्रमाणे शुभ्र आहे. डोंगराचा 90 टक्के भाग अशाच स्फटिकाचा बनलेला असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. चंद्राच्या सध्याच्या रचनेचे विश्लेषण करणे सोपे नाही. पृथ्वी व इतर एका ग्रहातून चंद्राची निर्मिती झाली असावी. दुसरा ग्रह मंगळाएवढा असावा. त्यावेळच्या ढिगा-या तून चंद्र अस्तित्वात आला असावा, असे संशोधकांना वाटते.

कसे सापडले अंश?
स्फटिकाप्रमाणे असलेल्या खडकांवर टाकण्यात आलेल्या अतिनील किरणांच्या तंत्राच्या साह्याने पाण्याच्या अस्तित्वापर्यंत पोहोचण्यात यश आले. त्यात संशोधकांना पाण्याचे सहा भागातील वेगळे रूपही पाहायला मिळाले आहे.

स्फटिकाचे डोंगर
चंद्र अस्तित्वाला येत असताना अगोदर स्फटिकासमान डोंगरांची निर्मिती झाली. त्यानंतर लाव्हापासून तयार झालेल्या चंद्राचा पृष्ठभाग तयार होत गेला.
कसे आहे अस्तित्व ?
चंद्रावर सापडलेले पाणी द्रव रूपात नाही. त्याचे स्वरूप हायड्रॉक्सील ग्रुपमध्ये आहे.ऑक्सिजनचा समावेश असलेला हा रासायनिक घटक आहे.
चंद्रावरून मिळवलेल्या काही नमुन्यांमध्ये आम्हाला हायड्रॉक्सील आढळून आले आहे. परंतु ते पाण्याच्या स्वरूपात नाही. खनिजाच्या रूपात ते सापडले आहे. चंद्रावरील खडकामुळे हे चकीत करणारे संशोधन होऊ शकले आहे.
यॉक्स झँग, संशोधक