आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍वर्गाहूनही सुंदर : चीनमधील या गावात चोहीकडे आहे पाणी, कालवे अन् पुल!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - चीनचे 'वॉटर टाउन' झोऊझुआंग)
ताई सरोवर आणि शांघायच्‍या दरम्‍यान वसलेले झोऊझुआंग (Zhouzhuang) शहर चीनमधील एक अप्रतिम 'वॉटर टाउन' आहे. शहरामध्‍ये कित्‍येक कालवे आणि पुल आहेत. चोहीकडून सरोवर आणि नदीच्‍या पाण्‍याने वेढलेले हे शहर स्‍वर्गाहूनही सुंदर भासते. येथील दळणवळण नौकेनेच करावे लागते.
14 पुल आकर्षणाचे केंद्र
शहरामध्‍ये पाणी आणि त्‍यावर बांधलेले आकर्षक पुल हे नयनरम्‍य आहेत. राजा युआन (1271-1368), मिंग (1368-1644) आणि किंग (1644-1911) यांच्‍या शासनामध्‍ये बनविलेले 14 पुल खास आकर्षण आहेत. 'ट्विन पुल' किंवा 'डबल पुल' शहरातील प्रतिष्ठिचे प्रतीक मानले जातात. या पुलांची निर्मिती राजा वान्ली (1573-1619) च्‍या कार्यकालात झाली.
एक हजार कुटुंबाचे शहर
या शहरातील 60 टक्‍के घरे मिंग आणि किंग राजांच्‍या राजवटीत बांधली गेली. पर्यटकांसाठी खास आकर्षक ठरते ते शेन तिंग यांचे घर. या घराचे बांधकाम 1742 मध्‍ये झालेले आहे. शेन, मिंग हे राजे अब्‍जाधीश होते. जवळपास 2,000 वर्ग मीटरमध्‍ये वसलेल्‍या या राजवाड्यामध्‍ये 100 खोल्‍या आहेत.
पुढील स्‍लाइडवर पाहा, चीनमधील अंत्‍यत सुंदर असलेल्‍या या शहराची छायाचित्रे