आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनची वेन जिया यू ठरली 'मिस वर्ल्ड-2012'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑर्दोस(चीन)- चीनची वेन जिया यू ही यंदाची जगातील सगळ्यात सुंदर तरुणी ठरली आहे. अर्थात वेन जिया यूने 'मिस वर्ल्ड'चा खिताब पटकावला आहे. वेन जिया हीने या स्पर्धेत सहभागी झालेल्या जगभरातील 115 तरूणींमधून 'मिस वर्ल्ड- 2012'च्या ताजवर स्वत:चे नाव कोरले. दुसरा क्रमांक मिस वेल्सने तर तिसरा क्रमांक मिस ऑस्ट्रेलियाने पटकावला.
भारताच्या मिस वान्या मिश्रा हीला मात्र स्पर्धेतील सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. मात्र तिने 'ब्युटी विथ पर्पज' आणि 'मल्टि मीडिया' अ‍ॅवॉर्ड पटकावले आहे.
मार्च महिन्यात 'फेमिना मिस वर्ल्ड इंडिया 2012' ठरलेल्या वान्या मिश्रा हिने स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
‘दिल चीज क्या है’वर वान्याने प्रेक्षकांना जिंकले