आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • We Came Become American, Not Indian American Bobby Jindal

अमेरिकन होण्यास आलो होतो; भारतीय-अमेरिकी होण्यासाठी नव्हे, बॉबी जिंदल यांचे वादग्रस्त वक्तव्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - आम्ही अमेरिकेत अमेरिकन होण्यास आलो होतो, भारतीय - अमेरिकी होण्यासाठी नव्हे. जर विदेशात भारतीय बनून राहिलो असतो तर आम्हाला भारतातच राहावे लागले असते, असे विधान भारतीय वंशाचे अमेरिकन गव्हर्नर बॉबी जिंदल यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला असून भारतीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आपण पूर्णपणे अमेरिकन आहोत, असेही जिंदल यांनी म्हटले आहे.

जिंदल म्हणाले, माझ्या आई - वडिलांनी मला व माझ्या भावांना म्हटले होते की, आपण अमेरिकेत अमेरिकन बनायला आलो आहोत. भारतीय - अमेरिकी नव्हे. आम्ही आमच्या नावासोबत ‘भारतीय’ संबोधन कायम ठेवले असते तर भारतातच राहावे लागले असते. बॉबी जिंदल सध्या अमेरिकेत ल्युसियाना प्रांताचे गव्हर्नर आहेत. २०१६ मध्ये होणा-या अमेरिकन राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ते रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार असतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी आपल्या भारतीय पार्श्वभूमीचा उल्लेख करताना अनिवासी लोकांनी अमेरिकन सभ्यता व संस्कृतीशी एकरूप व्हावे असे आवाहन केले.

भारतीय असल्याची लाज नाही
जिंदल म्हणाले,‘असे नाही की भारतीय असण्याची आम्हाला लाज वाटते. आम्हाला भारतीय असण्याचा अभिमान आहे. पण भारतीयच राहू इच्छित होतो तर आम्ही भारतातच राह्यला हवे होते. आम्ही अमेरिकेत आलो, कारण आम्हाला मोठ्या संधी हव्या होत्या.