आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Weather Stalls Search For AirAsia Plane's Black Boxes; First Victim Buried

एअर एशियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्ससाठी काही दिवस लागणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जकार्ता/सिंगापूर - एअर एशियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स प्राप्त करण्यासाठी आठवडाभराचा अवधी लागेल, अशी शक्यता इंडोनेशियातील अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, शोधपथकाने जावा बेटाजवळील समुद्रात विमानाचे अवशेष व मृतदेहांचा शोध सुरूच ठेवला आहे.

हवामानाने अपेक्षित साथ दिल्यास एअरबस ए ३२०-२०० विमानाचे अवशेष मिळणे कठीण असल्याचे इंडोनेशियाचे वाहतूक समिती सदस्य अँटोनिस टूस सँटियोस यांनी सांगितले. गोंगाट अथवा अन्य अडथळा नसेल आणि हवामानाने साथ दिल्यास विमानाचा ब्लॅक बॉक्स आठवडाभरात मिळू शकेल, परंतु त्याआधी विमान अवशेष मिळणे गरजेचे आहे. शोधपथकाला समुद्रातील विमान अवशेषाच्या ठिकाणाची निश्चित माहिती नाही. दुपारनंतर वातावरण बदलल्याने हेलिकॉप्टरना परतावे लागले. मात्र, जहाजांद्वारे मोहीम सुरूच असल्याचे एस. बी. सुप्रियादी या अधिकार्‍याने सांगितले. प्रवाशांचे मृतदेह अवशेषात असतील तर त्यामुळे ते बाहेर काढण्यासाठी हवामानाची साथ मिळायला हवी. ताजी माहिती योग्य असल्यास अवशेष निश्चित हाती लागतील, अशी आपण आशा बाळगू, या आशयाचे टि्वट विमान कंपनीचे अधिकारी टोनी फर्नांडिस यांनी केले.

दुप्पट क्षेत्रात शोधमोहीम
शोधमोहिमेची कक्षा दुप्पट म्हणजे १३,५०० चौ. नॉटिकल मैल क्षेत्रात विस्तारण्यात आली. सिंगापूरच्या नौदलाने पाणबुडी उपकरण सोडले आहे. ब्लॅक बॉक्स शोधण्यास त्याचा उपयोग होईल.