आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय घेण्यासाठी मदत करणारे वेबसाइट शास्त्रज्ञांने केले तयार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिस - आत्ताच घर खरेदी करायचे की नाही किंवा लग्न करण्यासाठी ही वेळ योग्य आहे की नाही, यासारख्या प्रश्नांबाबत अनेक जणांना निर्णय घेणे कठीण जाते. हीच समस्या जाणून सॅनफ्रान्सिस्को येथील क्लोव्हरपॉप यांनी नवी वेबसाइट तयार केली आहे. एखादा निर्णय घेताना मदत करणारी ही वेबसाइट संवादात्मक पद्धतीने काम करेल.

सध्या जगातील ४० टक्के प्रौढ आयुष्यात जीवन बदलवणा-या निर्णयांबाबत विचार करत असल्याचा दावा या शास्त्रज्ञाने केला आहे. कोणताही निर्णय घेताना अनेक जण झोप, प्रार्थना अथवा मित्रांचा सल्ला या पारंपरिक स्रोतांपासून मदत घेतात. मात्र या वेबसाइटद्वारे घेतला जाणारा तटस्थ निर्णय हा कोणत्याही प्रभावाखाली नसेल तसेच त्यात नकारात्मक परणिामांची भीती नसेल, असा दावा क्लोव्हरपॉप यांनी केला आहे. ही वेबसाइट तयार करण्यासाठी क्लोव्हरपॉप यांनी विज्ञान आणि डिझाइनची मदत घेतली आहे. वेबसाइटवर टेल द स्टोरी असा एक पर्याय असेल. यात युजरला ज्या गोष्टीबाबत निर्णय हवा आहे, त्याची सर्व माहिती नमूद करायची आहे. त्यानंतर अ‍ॅनलायझिंग बायस, प्रेडिक्टिंग व्हॉट ऑदर्स असेही पर्याय आहेत. अनॉनिमस कम्युनिटीदेखील ज्या व्यक्तींना निर्णय घेणे कठीण जात आहे, अशा व्यक्तींसाठी वेबसाइटवर अनॉनिमस कम्युनिटीदेखील आहे. यातून इतरांचे अनुभव, विवधि दृष्टिकोनांचा अभ्यास करायला मिळेल व त्याद्वारे निर्णय घेणे सोपे जाईल. ज्यांना सल्ल्याची आवश्यकता आहे, त्यांना वेबसाइटद्वारे मार्गदर्शन िमळेल.घालून देण्याचे कामही वेबसाइटच्या माध्यमातून केले जाणार आहे.