आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाहा, या सुशिक्षित व्यक्तींना, जे बनले जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ISIS कमांडर अबू बकर बगदादीचे छायाचित्र)

आंतरराष्ट्रीय डेस्कः इराकमधील सुन्नी कट्टरपंथी इस्लामिक स्टेट ऑफ इराक (आयएसआयएस) चे दहशतवादी बगदादच्या दिशेने पुढे सरकत आहेत. येथील परिस्थिती जवळपास हाताबाहेर गेली आहे. परंतु, इराकी सैन्य या दहशतवाद्यांना प्रत्यूत्तर देत आहे असे इराकचे उप-पंतप्रधान यांनी सांगितले आहे.
आपल्या माहितीसाठी, धर्माच्या नावावर जातीय युध्द छेडणार्‍या या संघटनांच्या प्रमुखांचे शिक्षण केवळ इस्लामिक शिक्षणापर्यंतच मर्यादित नाहीये. तर यातील एका प्रमुखाने दोन-दोन विषयांमध्ये पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. पाहूयात अशा काही निवडक दहशतवाद्यांबद्दलची माहिती, ज्यांनी जगामधील दहशतीला पर्याय बनले आहेत.
दहशतवादी संघटना - इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड अल-शाम (ISIS)
ऑपरेशनल एरिया- इराक और सीरिया
प्रमुख - अबु बकर अल बगदादी
शैक्षणिक माहिती- इस्लामिक विद्यापीठ (बगदाद) येथून डॉक्टरेटची पदवी
आयएसआयएसचा कमांडर अल बगदादी याचे पुर्ण नाव इब्राहीम अव्वद इब्राहीम अली अल बद्री अल समारी आहे. 1971 मध्ये इराकच्या समारा येथे जन्मलेल्या बगदादीने इस्लामिक विद्यापीठ (बगदाद) येथून डॉक्टरेची पदवी घेतली आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, सद्दाम हुसेन सरकारची सत्तापालट होण्याआधी बगदादी सुन्नी इस्लामी प्रचारक होता, मात्र आज हा दहशतवादी जगातील सर्वात शक्तीशाली दहशतवाद्यांपैकी एक आहे.
अल-कायदाच्या बहूचर्चीत ओसामा बिन लागदेन (मृत) आणि ऐमन जवाहिरी यांच्या उलट या दहशतवाद्याची केवळ दोनच छायाचित्रे पाहायला मिळतात. या दहशतवादीबद्दल असे सांगितले जाते की, याला आयएसआयएसच्या इतर कमांडरांनीसुध्दा नीट पाहिलेले नाही. बगदादी जास्तीत जास्त फोनच्या माध्यमातून संपर्कात राहतो. इराक आणि सिरियाच्या बहूतांश भागात आयएसआयएसचा ताबा आहे. बगदादीला पकडण्यासाठी 60 कोटींचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
वाचा... पुढील स्लाईडमध्ये इतर चार दहशतवाद्यांची महिती...