आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक साम्राज्यावरचा पाश्चिमात्य सूर्य मावळतीला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- पाश्चिमात्य देशांतील शिक्षणाचा दर्जा व गुणवत्तेची चर्चा नेहमीच केली जाते. या देशात शिकलेल्यांनाही विशेष महत्त्व प्राप्त होते. मात्र, शिक्षण क्षेत्रात पाश्चिमात्य देशांनी मिळवलेला लौकिक फार काळ राहणार नाही, असे चित्र आहे.
आमागी काळात भारतातील पदवीधरांची संख्या अमेरिकेपेक्षा अधिक असणार आहे. आॅर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोआॅपरेशन अ‍ॅँड डेव्हलपमेंट(ओईसीडी) या संस्थेच्या अहवालात हे तथ्य समोर आले आहे. येत्या आठ वर्षांत म्हणजे 2020 मध्ये जगातील प्रत्येक दहा पदवीधारकांमध्ये चार चीन किंवा भारतातील असतील. नवी आकडेवारी जगातील पदवीधारकांच्या संखेतील बदल दर्शवत आहे. मजबूत होत असलेल्या अर्थव्यवस्थेमुळे आशिया अमेरिका आणि यूरोपच्या देशांनाही मागे टाकत आहे, असे ओईसीडीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
ओईसीडीच्या अहवालानुसार, सन 2020 पर्यंत चीनमधील पदवीधरांची संख्येत 29 टक्क्यांनी वाढ होईल. त्या तुलनेत अमेरिकेतील पदवीधारकांच्या संख्येत 11 टक्क्यांनी घट होईल, असा अंदाज आहे. 2020 पर्यंत चीनमध्ये पदवीधारकांची संख्या सर्वाधिक असेल. त्यानंतर भारत दुसºया क्रमांकावर तर अमेरिका तिसºया क्रमांकावर असेल. याव्यतिरिक्त या यादीमध्ये इंडोनेशिया पाचव्या क्रमांकावर राहिल, अशी शक्यता आहे. शिक्षणातील घटलेल्या प्रमाणामुळे उच्च शिक्षणातील पाश्चिमात्य साम्राज्याचा अखेर तर ठरत नाही ना, असा सवाल उपस्थित होत आहे.
दुसºया महायुद्धानंतर अमेरिका, पश्चिम यूरोप, जपान आणि रशियातील विद्यापीठांचे जगात वर्चस्व होते. अमेरिकेचा विचार केल्यास प्रत्येक शिक्षणाच्या क्षेत्रात आतापर्यंत सुपरपॉवर राहिला आहे. 2000 वर्षांपर्यंत अमेरिकेत चीनच्या बरोबरीने पदवीधर होते. जपानसारखा छोटा देश पदवीधरांच्या संख्येबाबत भारताच्या बरोबरीने होता. परंतु आता परिस्थिती बदलली असून चीन आणि भारत पदवीधरकांचे सर्वांत मोठे देश म्हणून पुढे येत आहेत. औद्योगाला चालना देणाºया देशांमध्ये पदवीधारकांची संख्या वाढत आहे. चीनमध्ये वृद्धीदर अधिक आहे, असे ओईसीडीच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. ओईसीडीच्या अहवालानुसार, स्कॅडीनेव्हियन देश आणि यूरोपीय देशांमधील स्थितील चांगली राहिल. मात्र, चीन आणि भारतासारख्या देशांमध्ये ती अधिक उत्साहवर्धक नसेल. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील पदवीधारकांना रोजगारा्च्या अधिक संधी उपलब्ध होतील.
रोजगाराच्या संधी- 2020 पर्यंत चीनमध्ये जेवढे पदवीधर होतील, तेवढी अमेरिकेत 25 ते 64 वय असलेल्या लोकांची एकूण संख्या असेल. या अहवालात अनेक आश्चर्यजनक आकडे समोर आले आहेत. त्यामध्ये ब्राझीलमधील पदवीधारकांची संख्या जर्मनीपेक्षा अधिक असेल. तसेच तुर्कीमध्ये स्पेनपेक्षा जास्त आणि इंडोनेशियामध्ये फ्रान्सपेक्षा तिप्पट पदवीधारक असतील. असे असले तरी पदवीधारकांची संखा वाढल्याने रोजगारावर किती फरक पडेल हा सवाल उपस्थित झाला आहे.