आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एच-1 बी व्हिसा, भारतावर काय परिणाम?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन संसदेत सादर केलेल्या यूएस इमिग्रेशन विधेयकात एच-1 बी व्हिसाची संख्या 65 हजारांवरून 1 लाख 10 करण्याचा प्रस्ताव आहे. शास्त्र आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील कुशल व्यक्तींना संधी दिली जाईल, अशी अट लादण्यात आली आहे. अमेरिकेच्या नव्या धोरणाचा भारतावर काय परिणाम होईल ?

अमेरिकेत काम करण्यासाठी ‘एच-1बी’ हे वर्क परमिट अत्यावश्यक असते. गेल्या काही महिन्यांपासून या व्हिसाची मागणी वाढली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसने जाहीर केले होते की, एच-1बी व्हिसासाठी एक लाख 24 हजार अर्ज आले आहेत. ही आकडेवारी त्यावेळची आहे, ज्या वेळी एच-1बी व्हिसाची वार्षिक र्मयादा 65 हजार इतकी होती, तर मास्टर्स किंवा उच्च शिक्षण घेणार्‍यासाठी 20 हजारांचा कोटा होता. परिणामी फक्त एका आठवड्यात व्हिसा कोटा संपला. दिल्लीतील अमेरिकन दूतावासाच्या आकडेवारीनुसार एच-1बी व्हिसाची मागणी करणार्‍याच्या संख्येत यावर्षी 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे यूएस इमिग्रेशन बिल त्यातील काही तरतुदीमुळे चर्चेत आहे. या विधेयकाचे वैशिष्ट्य म्हणजे नऊ वर्षांनंतर एच-1बी व्हिसाची संख्या वाढवून ती 1 लाख 10 हजार करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावामुळे भारतीयांना जास्त आनंद झाला आहे, कारण असे झाल्यास अमेरिकेला जाण्याची संधी वाढतील, पण भारतातील आयटी कंपन्या काहीशा नाराज आहेत.

प्रशिक्षित कर्मचारी हवेत
या नव्या प्रस्तावित विधेयकात टॅलेंटला अग्रस्थानी ठेवण्यात आले आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, सायन्स आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील कुशल आणि प्रशिक्षित व्यक्तींनाच व्हिसा देण्यात येईल. अकुशल व्यक्तींना नव्या प्रस्तावात कोणतेच स्थान नाही, म्हणून वाद सुरू आहे. तर दुसरीकडे ग्रीन कार्डची दीर्घ प्रक्रिया आणि अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्याच्या औपचारिक कामाला लागणार्‍या वेळामुळे हजारो उच्चशिक्षित अनिवासी भारतीयांवर देश सोडण्यासाठी दबाब टाकला जात आहे. यात तेदेखील लोक आहेत, ज्यांनी अमेरिकेत शिक्षण घेतले आहे किंवा बर्‍याच वर्षांपासून शिक्षण घेत आहेत. विधेयकात मेरिटवर आधारित व्हिसा आणि ग्रीन कार्ड फास्ट ट्रॅकिंग करण्याचासुद्धा प्रस्ताव आहे.

अर्थव्यवस्थेला चालना देण्याची कवायत
एच-1बी व्हिसाचा कोटा वाढवून डळमळीत झालेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे, असे आयटी कंपन्यांना वाटते. सिलिकॉन व्हॅलीमधील आयटी सर्व्हिस कंपनी आर्यकाचे सीईओ अजित गुप्ता यांच्या मते अमेरिकी अर्थव्यवस्थेत एच-1बी व्हिसा कॅप महत्त्वाचा बॅरोमीटर आहे. याचा कोटा वाढवल्यास निश्चितपणे अमेरिकन अर्थव्यवस्थेवर चांगला प्रभाव पडेल, तर न्यूयॉर्क इमिग्रेशनचे अँटर्नी सायरस डी मेहता याला योग्य मानत नाहीत. ते म्हणतात की अनेक आयटी कंपन्यासुद्धा एल-1बी इंट्रा कंपनी ट्रान्सफर व्हिसाऐवजी (अमेरिकेत काम करण्यासाठी कंपन्यांना दिला जाणारा व्हिसा) एच-1बी व्हिसासाठी अर्ज करत आहेत. म्हणून अडचणी वाढत आहेत.

एच-1बी व्हिसाची प्रक्रिया

1. कामगार मंत्रालय
नोकरी देणार्‍याला एक लेबर कंडिशन अप्लिकेशन(एलसीए) कामगार मंत्रालयाकडे जमा करावा लागतो. या अर्जात कंपनी आपल्या गरजेप्रमाणे एक किंवा अधिक कर्मचार्‍यांची आवश्यकता दाखवत त्यांच्यासाठी एच-1बी व्हिसाची मागणी नोंदवते. सोबत कंपनीची सविस्तर माहिती दिलेली असते.

2. होमलँड सिक्युरिटी
परवानगी मिळाल्यानंतर या एलसीएला आयई-129 फॉर्मसोबत गृह सुरक्षा विभागाच्या इमिग्रेशन सर्व्हिसकडे पाठवला जातो. व्यक्ती अमेरिकेत काम करण्याच्या पात्रतेचा आहे काय? हे आयई-129 फॉर्ममधून सिद्ध होते. यासोबत नोकरी देणार्‍याला 1575 डॉलर ते 4325 डॉलर शुल्क जमा करावे लागते.

3.स्टेट डिपार्टमेंट
व्हिसाधारक आपला एच-1बी पॅकेज अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटकडे जमा करतो. येथील अधिकारी कामगाराची मुलाखत घेतात आणि त्याची इतर कागदपत्रांची तपासणी करतात.

4. व्हिसा जारी
अर्जदाराकडून सर्व कायदेशीर पूर्तता झाल्यानंतर त्याला व्हिसा दिला जातो. या प्रक्रियेत कोणतीही अडचण आल्यास व्हिसा मिळवण्यास विलंब होतो.


सर्वात जास्त एच-1बी व्हिसाधारक

जगभरात एच-1बी व्हिसा देणार्‍या कंपन्या आणि त्यांच्याकडून देण्यात आलेले एच-1बी व्हिसा


कंपनी 2011 2012

कॉग्निझेंट 5095 9281

टाटा 1659 7469

इंफोसिस 3360 5600

विप्रो 2803 4304

अँक्सेंचर 1304 4037

एचसीएल अमेरिका 930 2070

महिंद्रा ग्रुप 404 1963

आयबीएम 987 1846

लार्सन अँड टुब्रो 1156 1832

डेलोटे 798 1668

मायक्रोसॉफ्ट 1384 1497

पाटनी अमेरिकास 164 1260

सिंटेल 364 1164

(स्रोत : कॉम्प्युटर वर्ल्ड अँनालिसिस )

एच-1बी व्हिसा कॅप

सुरुवातीपासून आतापर्यंत किती वाढली आणि कमी झाली एच-1बी व्हिसाची संख्या


1990 65000

1998 1,15000

2001,2003 1,95,000

2004 65,000+20,000 (अमेरिकेतून मास्टर किंवा उच्च पदवी घेणार्‍यासाठी अतिरिक्त)

2004-2007 2 ते 7 महिने लागले हा कोटा भरण्यासाठी

2008 पहिल्यांदाच एक दिवसात कोटा भरला गेला.

2009 अमेरिकन मंदीमुळे 65 हजारांचा कोटा भरण्यासाठी 264 दिवस लागले.

2010 300 दिवसांपर्यंत एच-1बी व्हिसा उपलब्ध होता.

2011 235 दिवसांपर्यंत कॅप भरती सुरू होती.

2012 अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्याने 73 दिवसांत कॅप भरला गेला.

2013 एका आठवड्यात कोटा भरला गेला.

काय आहे स्थलांतर विधेयकात ?
65 हजार एच-1बी व्हिसा कॅपला वाढवून 1.10 लाख करण्याचा प्रस्ताव
30 टक्क्यांपेक्षा जास्त एच-1बी व्हिसाधारक ज्या भारतीय कंपन्यांत काम करत आहेत. त्याच्या नव्या व्हिसासाठी अमेरिकन सरकारला मोठी रक्कम द्यावी लागणार आहे.
60दिवसांची मुदत मिळते ज्या एच-1बी व्हिसाधारकाची नोकरी गेली आहे. त्यांना या काळात नवी नोकरी शोधावी लागते.

हेदेखील जाणून घ्या
विवेक वाधवा या भारतीय वंशांच्या अमेरिकन लेखकाने स्थलांतर धोरणाविषयी ‘द इमिग्रेशन एक्जोड्स : व्हाय अमेरिका इज लूजिंग द ग्लोबल रेस टू कॅप्टर एंटरप्रेन्योरियल टॅलेंट’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात एच-1बी व्हिसाशी निगडित काही नकारात्मक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.