आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलियन्सबाबत वैज्ञानिक करत आहेत संशोधन, अंतराळ मोहिमाही सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एलियन असे जीव आहेत जे परग्रहावर राहतात, असे मानले जाते. पण ती वास्तवात आहेत की नाही हा मोठा प्रश्‍न आहे. एलियन्सच्या अस्तित्वाबाबत अनेक वर्षांपासून संशोधन चालू आहे. परंतु आतापर्यंत ती असतात की नाही याबाबत प्रबळ पुरवा मिळालेला नाही. जर ते असतील तर कुठे राहतात? ती तंत्रज्ञानात्मक दृष्‍ट्या किती सक्षम आहेत ? असे अनेक प्रश्‍न जगभरातील वैज्ञानिकांसाठी आव्हानाची ठरली आहे. पृथ्‍वी व्यतिरिक्त दुस-या ग्रहावर जीव आहे की नाही याबाबत संशोधनांने वेग घेतला आहे. काही प्रमाणात समाधानकारक बाबी समोर आल्या आहेत. पण त्याने समाधानकारक स्पष्‍टीकरण मिळालेले नाही.

अनेक ठिकाणी अस्तित्व असण्‍याची शक्यता
मंगळ ग्रहाव्यतिर‍िक्त आपल्या आकाशगंगेत मानवाला राहण्‍याजोगी अनेक ग्रह असण्‍याची शक्यता वर्तवली जात आहे. यात गुरू आणि शनिचा बर्फाळ चंद्र, युरोपा आदींचा समावेश होतो. आपल्या आकाशगंगेतील शनिग्रहाचा चंद्र टायटन आणि सौर व्यवस्थेच्या बाहेर असलेला 'ग्लीज 518 जी' ग्रहावर जीवन असण्‍याची सर्वाधिक शक्यता आहे. तो पृथ्‍वीपासून 20.5 प्रकाश वर्ष दूर आहे. एक प्रकाश वर्षामध्‍ये 100 अब्ज किलोमीटर असतात. पृथ्‍वीसारखे ग्रह शोधण्‍यासाठी शास्त्रज्ञांनी दोन याद्या बनवल्या होत्या. एक सिमिलॅरिटी इंडेक्स आणि दुसरी प्लॅनेटरी हॅब‍िटॅबिल‍िटी इंडेक्स. या सूचीत पृथ्‍वीसारखी जीवसृष्‍टी असलेल्या ग्रहांचे समावेश करण्‍यात आले आहे.
नासाने 2009 मध्‍ये कॅप्लर स्पेस टेलिस्कोप यान अंतराळात पाठवले होते. या टेलिस्कोपने हजारो अशा ग्रहांचा शोध लावला जिथे जीव असण्‍याची शक्यता आहे . 4 नोव्हेंबर 2013 मध्‍ये नासाने केप्लर स्पेस क्राफ्टने 104 अशी ग्रह शोधली होती, जिथे जीवसृष्‍टी असण्‍याची शक्यता आहे.

कंटेंट - शादाब समी

पुढे वाचा एलियनशी सं‍बंधित काही गोष्‍टी....