आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांत्रिक बिघाडामुळे WhatsApp ची सेवा तीन तास राहिली बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- तांत्रिक बिघाडामुळे मोबाईल मेसेजिंग अप्लिकेशन WhatsApp ची सेवा तब्बल तीन तास बंद राहिली. त्यानंतर ही सेवा पूर्ववत करण्यात आली. काही दिवसांपूर्वी सोशल नेटवर्कींग वेबसाईट फेसबुकने तब्बल 19 बिलियन डॉलरला विकत घेतल्यानंतर WhatsApp चर्चेत आले आहे.
तांत्रिक बिघाड झाल्याचे वृत्त WhatsApp ने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शनिवारी सायंकाळी 5 वाजून 48 मिनिटांनी दिले. दोष दूर करण्यासाठी काम सुरू असून लवकरच सेवा पूर्ववत केली जाईल, असेही या संदेशात सांगण्यात आले होते. WhatsApp ने संदेशात आणखी लिहिले होते, की WhatsApp ची सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. युजर्सच्या असुविधेबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
केवळ पाच वर्षांपूर्वी WhatsApp सुरू करण्यात आले होते. याचे सध्या 45 कोटी युजर्स आहेत. याच्या युजर्सची संख्या दररोज दहा लाखांनी वाढत आहे.