आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाळीदार कुंपणातील ही अंडी कोणत्या प्राण्‍याची ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्रॉय अलेक्झांडर या रसायन पारिस्थितीकी शास्त्रज्ञाने अमेरिकेतील अँमेझॉन पावसाळी वनांमध्ये एक विशिष्ट प्रकारची संरचना पाहिली. तेथे सूक्ष्म जाळ्यांनी तयार केलेल्या कुंपणात अंडी सुरक्षित ठेवण्यात आली होती. या कुंपणाचा व्यास दोन सेंटीमीटरचा आहे. या रचनेचे छायाचित्र रेडिट, वियर्ड इत्यादी साइट्सवर टाकल्यानंतर व्हायरल झाला आहे. ट्रॉयसह किटकशास्त्रज्ञ, बुरशीशास्त्रज्ञ आणि संग्रहालयाच्या संचालकांसह अनेकांनी हे छायाचित्र पाहिले; पण ते कोणत्या प्राण्याने किंवा कीटकाने तयार केले आहे, हे कुणालाही सांगला आले नाही. पेरूमधील टँबोपाटा संशोधन केंद्राजवळील परिसरात ट्रॉय अलेक्झांडर जॉजिर्या यांनी ही संरचना पाहिली. ट्रॉय तेथे तीन महिन्यांच्या प्रकल्पासाठी गेले होते. या अध्ययनात त्यांना एखादी नवी प्राण्याची जातही सापडली असू शकते. B wired.com