आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : पाहा, कशी गायब झाली जमिन आणि बेपत्ता झाली घरे...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- वॉशिंग्टनजवळील एका छोट्या आईसलॅंडमधील लोकांची आजची सकाळ धक्कादायक व त्रासदायक ठरली. कारण येथील आईसलॅंडमधील जमीन फाटल्यामुळे अनेक लोकांची घरे पडली. काहींची तर घरे जमिनदोस्त झाली. तर काही घरांचे किरकोळ नुकसान झाले. ज्या ठिकाणी ही जमिन अचानकपणे फाटली तेथील रहिवाशी ब्रेट होल्‍मने सांगितले की, मी जोराचा आवाज ऐकला. मी जेव्हा खिडकीतून घराच्या बाहेर पाहिले तेव्हा मला एकही झाड दिसले नाही. तसेच माझी जमिनच गायब झाली होती.

ही जमिन सुमारे 500 फूट लांब फाटत गेल्यामुळे स्थानिक नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. इथल्या बेटावरील लोकांनी सांगितले की, पहाटे चार वाजता जोरदार आवाज आला. जेव्हा बाहेर आम्ही पाहिले तेव्हा सगळी जमिन सपडासाफ होत गेली. जमीन समुद्रात सामावलेली दिसली. ही लॅंड स्‍लाईड (जमिन फाटणे) ब-याच वेळ सुरु होती. पोलिसांनी आता क्षेत्रात नागरिकांना जाण्यास बंदी घातली आहे. पुढे छायाचित्रातून पाहा, कशी फाटली जमिन...