आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • White Widow 'is Alive And Living With Jihadist Al Qaeda Husband In Somalia

नवीन पतीसोबत समोर आली ISISच्या 'व्‍हाइट विडो'ची सेल्फी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केनिया - 'व्हाइट विडो' नावाने चर्चेत असलेली कुख्यात दहशतवादी समांथा ल्यूथवेट जिवंत आहे. काही दिवसांपूर्वीच समांथा ल्यूथवेट मारली गेल्याची बातमी आली होती. केनियाच्या सूत्रानुसार, 'व्हाइट विडो' सध्या आपल्या नवीन पतीसोबत दक्षिण सोमालियात राहत आहे. तिचा पती अलकायदाचा वॉंटेड दहशतवादी आहे. याचे नाव मार्को कोस्टा असे सांगण्यात येत आहे. समांथा आणि मार्कोचा एक सेल्फी फोटो मिळाला आहे. या फोटो आणि पासपोर्टच्या आधारावर दोघांचा शोध सुरु आहे.

ब्रिटीश वेबसाईट डेलीमेलला 'मार्को कोस्टा'चा पासपोर्ट मिळाला आहे. मोझांबिकच्या या पासपोर्टमध्ये याचे नाव फहमी जमाल सलीम लिहिण्यात आले आहे. याने 2011 मध्ये नैरोबीत दोन पोलिसांची गोळ्या मारून हत्या केली होती.

दहशतवादी संघटनांशी लढणार्‍या केनियाच्या सूत्रांनी रशियन वृत्तसंस्थेने समांथा ल्यूथवेट मृत झाल्याच्या दाव्याचे खंडन केले आहे. एका रशियन स्नायपरने 30 वर्षीय समांथा ल्यूथवेटला ठार मारल्याचा दावा मॉस्को वृत्तसंस्थेने केला होता.

केनियाच्या गुप्तचर विभागाने समांथाच्या मृत्युच्या पुष्टीसाठी तिचे शव दाखवण्याची मागणी केली आहे. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, "आमच्याकडे समांथाच्या लोकेशनशी संबधित ताजी माहिती आहे. काही वर्षांपूर्वी ती जिहादी संघटनेत कार्यरत होती, परंतु सध्या ती पती आणि मुलांसोबत राहत आहे."
कोण आहे 'व्हाइट विडो'
'व्हाइट विडो' नावाने कुख्यात असलेल्या समांथाचे नावा नैरोबीमध्ये मृत्यू तांडव करणार्‍या दहशतवाद्यांमध्ये आले होते. 7 जुलै 2005 मध्ये लंडनमध्ये आत्मघातकी हल्ला करणार्‍या जर्मेन लिंडसे याची समांथा विधवा आहे. या हल्ल्यात 52 जणांचा मृत्यू झाला होता. रशिया वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, लंडनमधील हल्ल्यानंतर समांथा अंडरग्राउंड झाली होती. त्यानंतर 2011 मध्ये ती केनियाच्या मोम्बासा येथे असल्याचा सुगावा लागला. या दरम्यानच्या काळात ती सोमालियाची दहशतवादी संघटना अल-शबाबसोबत गेली होती आणि 'व्हाइट विडो' नावाने कुप्रसिद्ध झाली होती. 2013 मध्ये नैरोबी येथील मॉलमध्ये झालेल्या हल्ल्याची ती सूत्रधार होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'व्हाइट विडो' चे फोटो...