आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Who Is Real Father Of Micheal Jacson's Son Prince Micheal?

मायकल जॅक्‍सनच्‍या मुलाचा खरा पिता कोण?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवंगत पॉप स्‍टार मायकल जॅक्‍सनचा मुलगा प्रिंस याचा खरा पिता कोण, यावरुन आता वाद सुरु झाला आहे. प्रिंसचा जैविक पिता असल्‍याचा दावा एका डॉक्‍टरने केला आहे. दावा करणारा हा डॉक्‍टर मायकल जॅक्‍सनचा डर्मेटॉ‍लॉजिस्‍ट राहिलेला एर्नी क्‍लीन आहे. त्‍याने फेसबूकवर एका पोस्‍टमध्‍ये इशा-यात स्‍वतः प्रिंसचा खरा पिता असल्‍याचा दावा केला आहे.

मायकल जॅक्‍सन यांनी वारंवार हेच सांगितले होते की, तिन्‍ही मुलांचे जैविक पिता मीच आहे. त्‍यापैकी दोघांना त्‍यांची पूर्व पतनी डेबी रोव्‍हने जन्‍म दिला आहे. परंतु, डॉ. क्‍लीनच्‍या दाव्‍याने वेगळाच वाद निर्माण होऊ शकतो.