आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरागस मुलांवर हल्ला करणार्‍या संघटनेच्या नावाचा अर्थ \'पाकिस्तानी विद्यार्थी अभियान\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर - पाकिस्तानच्या पेशावरमध्ये आर्मी स्कूलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 100 हून अधिक लोक मारले गेल्याचे वृत्त आहे. 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. एका आत्मघातकी दहशतवाद्याने स्वतःला स्फोटाने उडवून दिल्याने मोठ्या प्रमाणात जीवीत हानी झाली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, दहशतवादी हे अरबी भाषेत बोलत होते. त्यामुळे दहशतवादी हे पाकिस्तानी नसतील अशी शंका व्यक्त होत आहे. ताज्या माहितीनुसार, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने म्हटले आहे, की पाकिस्तानी लष्कराने आमच्या बायका-मुलांवर हल्ला केला होता. आपल्या आप्त स्वकियांना गमावण्याचे दुःख काय असते, हे पाकिस्तानला समजले पाहिजे त्यासाठी शाळेवर हल्ला करण्यात आला.
काय आहे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान
- तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेला तालिबान पाकिस्तान देखील म्हटले जाते. अफगाणिस्तानातील तालिबान संघटनेशी या दहशतवादी गटाचा संबंध नाही. मात्र, त्यांच्या आणि टीटीपीच्या विचारधारेत फार काही अंतर देखील नाही.
- पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सीमेवरील आदिवासी भागातील कट्टरपंथी गटांचे हे संघटन आहे.
ध्येय
तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान ही कट्टरपंथी संघटना आहे. यांचा उद्देश पाकिस्तानमध्ये शरीयावर आधारित एक कट्टरपंथी इस्लामी प्रांत तयार करणे आहे.
स्थापना
या कट्टरपंथी संघटेची स्थापना 2007 मध्ये बेयतुल्लाह मसूदच्या नेतृत्वात करण्यात आली. तहरिकचा अर्थ 'अभियान' असा होतो. मसूदच्या नेतृत्वात दहशतवाद्यांच्या 13 गटांनी एक होण्याच निर्णय घेतला आणि तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान संघटनेची स्थापना केली.
काश्मीर - भारतातही सक्रीयतेचा प्रयत्न
तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान ही कट्टरवादी संघटना आधुनिकतेला नकार देते. या संघटनेने जानेवारी 2013 मध्ये भारतातही शरियाच्या आधारीत कायदा असला पाहिजे, अशी घोषणा केली. भारतातील लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता संपवण्याचीही त्यांनी घोषणा केली होती. त्यासाठी काश्मीर आणि भारतातील इतर भागात सक्रीय होण्याचा प्रयत्न केला आहे.
नावाचा अर्थ
तहरिक या शब्दाचा अर्थ अभियाना किंवा मोहीम असा होतो, तर तालिब म्हणजे विद्यार्थी (धार्मीक शिक्षण घेणारा) तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा अर्थ होतो 'पाकिस्तानी विद्यार्थी अभियान'.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, हल्ल्याची आणखी छायाचित्रे..