आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल कायदाप्रमाणेच अल शबाबही धोकादायक, अमेरिकेलाही आहे दहशत....

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केनियातील वेस्‍टगेट मॉलमध्‍ये मुंबईप्रमाणेच दहशतवादी हल्‍ला करण्‍यात आला. सोमालीयातील दहशतवादी संघटना अल शबाबने हा हल्‍ला केला. या हल्‍ल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. ही संघटना अतिशय धोकादायक आहे. अल शबाब सोमालीयासारख्‍या गरीब देशातील संघटना आहे. मात्र, अमेरिकेपर्यंत या संघटनेने पाय पसरले आहेत. अमेरिकेलाही या संघटनेची दहशत आहे. अल शबाबच्‍या दोन दहशतवाद्यांवर प्रत्‍येकी 50 लाख डॉलर्सचे बक्षीस आहे.

अल शबाबला दक्षिण आफ्रिकेत वर्चस्‍व स्‍थापित करायचे आहे. गेल्‍या काही वर्षांपासून अल शबाबची 26/11 सारख्‍या हल्‍लयाची तयारी सुरु होती. 'अल कायदा'सोबत या संघटनेची जवळीक आहे. युरोप आणि अमेरिकेत दहशतवादाच्‍या नेटवर्कमध्‍ये अल शबाबचा कोणत्‍या कोणत्‍या प्रकारे संबंध आहेच. अल शबाबचे अनेक दहशतवादी ब्रिटन, फ्रान्‍स आणि ऑस्‍ट्रेलियात पकडल्‍या गेले आहेत.

अल शबाबसंदर्भात अधिक माहिती जाणून घ्‍या पुढील स्‍लाईड्समध्‍ये...