आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Knowledge : फेसबुकने व्हॉट्सअ‍ॅपला का विकत घेतले?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2009 मध्ये फेसबुक ने व्हॉट्सअ‍ॅपचे संस्थापक ब्रायन अ‍ॅक्टनला नोकरी देण्यास नकार दिला होता. त्याच ब्रायनच्या कंपनीला आज फेसबुकने 19 अब्ज डॉलर (रुपये एक लाख 18 हजार कोटी) मध्ये खरेदी केले. याच्या मुख्य कारणांचा शोध घेता व्हॉट्सअ‍ॅपची बलस्थाने ध्यानात येतील.
कंपनीत अभियंत्यांची संख्या 32
जगातील अग्रगण्य तंत्रज्ञान असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये 32 अभियंते आणि 1 अ‍ॅप डेव्हलपर इतकाच स्टाफ आहे. एका वेळी 14 दशलक्ष वापरकर्त्यांना हाताळण्याचे कसब इतक्या कमी मनुष्यबळात करणे, सगळ्या माहिती तंत्रज्ञ जगतालाही चकित करणारी बाब आहे. 50 अब्ज मेसेजेसला एका वेळी प्रोसेस करण्याची किमया या चमूने केली आहे.

विपणनात कंपनीची गुंतवणूक शून्य
व्हॉट्सअ‍ॅपचा एकही विपणन प्रतिनिधी नाही. विपणनात शून्य गुंतवणूक असूनही कंपनीने प्रस्थापित कंपन्यांना तीव्र स्पर्धा दिली आहे. शिवाय ग्राहकांशी दृढ नाते निर्माण केले आहे.